
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडच्या ग्लॅमरमागे नक्कीच एक रहस्यमय घटना लपलेले असते ज्याबद्दल अनेक कलाकार सांगताना दिसतात. अलिकडेच, अभिनेत्री मौनी रॉयने इंडस्ट्रीमध्ये तिच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. स्पाइस इट अपवरील अपूर्वा मुखिजाशी झालेल्या संभाषणात, अभिनेत्रीने खुलासा केला की तिला कधीही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला नाही, परंतु वयाच्या २१ व्या वर्षी तिला एक धक्कादायक अनुभव आला. जो अभिनेत्रीने आता अनेक वर्षांनी शेअर केला आहे.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री – गायिका सुलक्षणा पंडित यांचे 71 व्या वर्षी निधन
मौनी रॉयवर झाला अत्याचार
बॉलीवूडमध्ये कधी कास्टिंग काउच किंवा गैरवर्तनाचा अनुभव घेतला का असे विचारले असता तिने उत्तर दिले, “मी कास्टिंग काउचचा अनुभव घेतला नाही, पण मला गैरवर्तनाचा अनुभव आला. मी २१ वर्षांची होते आणि मी कोणाच्या तरी ऑफिसमध्ये गेले होते. लोक तिथे होते आणि एक गोष्ट सांगितली जात होती. अचानक, एक दृश्य येते ज्यामध्ये एक मुलगी स्विमिंग पूलमध्ये पडते. ती बेशुद्ध होते आणि हिरो तिला बाहेर काढतो, तिच्या तोंडात तोंड ठेवतो आणि तिला पुन्हा जिवंत करतो. मुलगी शुद्धीवर येते.” असे अभिनेत्री म्हणाली.
अभिनेत्री मौनी रॉय घाबरली
मौनी पुढे म्हणाली, “एका पुरूषाने माझा चेहरा धरला आणि मला तोंडाला तोंड लावून कसे पुनरुज्जीवन द्यायचे ते सांगितले. त्या क्षणी, मला काय होत आहे ते समजले नाही. मी पळून गेले. या घटनेने मला भीती वाटली अनेक वर्षांनी मी या घटनेतून बाहेर आली.” अभिनेत्रीचा हा प्रसंग ऐकून चाहते देखील थक्क झाले आहेत.
आपल्या हटके स्टाईलने Bigg Boss 19 मध्ये परतला प्रणित मोरे, स्पर्धकांना बसला धक्का; चाहते झाले खुश
मौनीची संपूर्ण चित्रपट कारकीर्द
मौनीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात “क्यूंकी सास भी कभी बहू थी” या प्रतिष्ठित शोमधून केली. तिने २०१८ मध्ये अक्षय कुमारसोबत “गोल्ड” चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि नंतर “रोमियो अकबर वॉल्टर” आणि “मेड इन चायना” मध्ये काम केले. “ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा” मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला प्रशंसाही मिळाली. तसेच आता ती अनेक नवनवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.