(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“बिग बॉस १९” च्या घरात चाहत्यांचा आवडता स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे एका हटके अंदाजात पुन्हा परतणार आहे. या हंगामाच्या सुरुवातीला प्रणित मोरेने डेंग्यूमुळे शो सोडला, कॅप्टनसी टास्क जिंकल्यानंतर लगेचच. त्याच्या जाण्याने स्पर्धकांना आणि चाहत्यांना धक्का बसला, परंतु त्याचे पुनरागमन खूपच मनोरंजक असणार आहे. तसेच आता प्रणित घरात पुन्हा आल्यामुळे चाहते खूप खुश झाले आहे.
शुक्रवारीच्या भागात प्रणित मोरे घरात प्रवेश करताना दिसणार आहेत. नवीन प्रोमोमध्ये असे दिसून आले आहे की प्रणित मोरे स्टोअर रूममधून परत येणार आहे. जेव्हा स्टोअरची बेल वाजते तेव्हा नीलम गिरीला समजते की कोणीतरी तिथे लपले आहे, ज्यामुळे अभिषेक बजाज आणि गौरव खन्ना यांना विश्वास बसतो की प्रणित आला आहे. त्यानंतर फरहाना आत जाते आणि धक्का बसतो. मृदुल धावत आत येतो आणि ओरडत प्रणितला पकडतो. काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो. तसेच गौरव, मृदुल, अभिषेक, अशनूर आणि मालतीला आनंद होतो.
Sabke chehre pe hai khauf, Bigg Boss ke ghar mein kuch toh ajeeb ho raha hai! 😨 Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @colorstv par. Watch Now:- https://t.co/XNlwzrEgyf pic.twitter.com/dtoyrFH0sO — JioHotstar Reality (@HotstarReality) November 6, 2025
प्रणित मोरे ‘बिग बॉस १९’ मध्ये परतला
याव्यतिरिक्त, प्रणित मोरे बिग बॉसच्या घरात ‘द प्रणित मोरे शो’ देखील होस्ट करताना दिसणार. तो पुन्हा एकदा घरातील सदस्यांना भुरळ घालेल आणि तेही त्याच्याच शैलीत. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसने परतल्यावर प्रणित मोरेला एक विशेष अधिकार दिला आहे, ज्यामुळे तो एका नामांकित स्पर्धकाला घराबाहेर पडण्यापासून वाचवू शकतो. या आठवड्यात, गौरव खन्ना, नीलम गिरी, फरहाना भट्ट, अशनूर कौर आणि अभिषेक बजाज बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. चाहत्यांचा अंदाज आहे की मोरे गौरव खन्ना किंवा अशनूर कौर यांना वाचवू शक्यता आहे. ज्यामुळे खेळाचा मार्ग बदलण्याची शक्यता आहे.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री – गायिका सुलक्षणा पंडित यांचे 71 व्या वर्षी निधन
फरहाना आणि नीलम यांच्यात टक्कर
‘वीकेंड का वार’ साठी घराची तयारी सुरू असताना, दुहेरी घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या ट्रेंडवरून असे दिसून येते की नीलम गिरी आणि फरहाना भट्ट सर्वात जास्त धोक्यात आहेत, तर प्रणित मोरेची सत्ता उर्वरित नामांकित स्पर्धकांसाठी निकाल बदलण्याची शक्यता आहे. तसेच आता हा खेळ आणखी रंगणार आहे.






