
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“धुरंधर” चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्या वयात जवळपास २० वर्षांच्या अंतरामुळे व्यापक चर्चा रंगली. सोशल मीडियावर या जोडीवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. या वयाच्या अंतरावर अनेकांनी टीका केली, तर काहींनी असा युक्तिवाद केला की ही जोडी चित्रपटाच्या कथेनुसार आणि पात्रांमुळे योग्य आहे. आता, चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सांगितले की, रणवीर सिंगपेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या सारा अर्जुनला “धुरंधर” मध्ये जाणूनबुजून ति लाकास्ट करण्यात आले असल्याचे समजले आहे. त्यांनी स्पष्ट केले की हे चित्रपटाच्या कथेच्या गरजेनुसार पूर्ण करण्यासाठी केले गेले आहे. तसेच २० वर्षाच्या अभिनेत्रीला का कास्ट करण्यात आले हे चित्रपटाच्या दुसऱ्या भागात समजणार आहे.
“उत्तर दुसऱ्या भागात मिळेल” – मुकेश छाब्रा
मुकेश छाब्रा यांनी फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. कथा अशी आहे की तो तिला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून, आम्हाला माहित होते की आम्हाला २०-२१ वर्षांच्या एका तरुण मुलीची गरज आहे आणि जेव्हा भाग २ येईल तेव्हा वयाच्या फरकाबद्दल बोलणाऱ्यांना सर्व उत्तरे मिळतील.”
चित्रपटाला या वयाच्या फरकाची गरज होती?
मुकेश छाब्रा पुढे म्हणाले, “असे नाही की आपल्याकडे २६-२७ वयोगटातील चांगल्या अभिनेत्री नाहीत, आपल्याकडे चांगल्या अभिनेत्री आहेत. पण चित्रपटाला या वयाच्या फरकाची गरज होती. सर्वकाही स्पष्ट करता येत नाही. जेव्हा मी वयाच्या फरकाबद्दल वाचत होतो तेव्हा मी हसत होतो. ते चित्रपटाच्या कथेशी जुळते.” असे ते म्हणाले आहेत. आणि कथेला पूर्ण करेल अशी स्टारकास्ट घेण्यात आली आहे.
‘चेहऱ्यात 67 काचेचे तुकडे…’ अपघातात ‘या’ अभिनेत्रीचा चेहरा झाला होता विद्रूप; म्हणाली…
मुकेश छाब्रा यांच्या अधिकृत विधानात स्पष्टपणे म्हटले आहे की वयातील अंतर केवळ वाद निर्माण करण्यासाठी नव्हते, तर ते कथा आणि पात्रांच्या शैलीसाठी आवश्यक होते. चित्रपटाच्या कथानकाद्वारे आणि पात्रांमुळे ही जोडी योग्य ठरते. सिक्वेलमध्ये या निवडीचे संपूर्ण स्पष्टीकरण दिले जाईल, ज्यामुळे प्रेक्षकांना कथेसाठी ही जोडी का आवश्यक होती हे पूर्णपणे समजेल. हा चित्रपट सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालताना दिसत आहे. तसेच चाहत्यांना तो आवडत आहे.