(फोटो सौजन्य - अकाउंट)
‘बिग बॉस १७’ चा विजेता आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनी मेरठमध्ये पोलिसांनी जारी केलेल्या नमाजच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे. या आदेशावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी विचारले आहे की आता भारतातील रस्त्यांवर कोणताही उत्सव होणार नाही का? या प्रश्नाद्वारे त्यांनी देशातील रस्त्यांवर साजरे होणाऱ्या इतर सर्व सणांचा मुद्दा उपस्थित केला आहे. मेरठ पोलिसांनी कधी आणि कोणता आदेश जारी केला आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
वाढदिवशी ‘या’ प्रसिद्ध रॅपरने गमावला आपला जीव, वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !
मेरठ पोलिसांचे परिपत्रक काय आहे?
शुक्रवारी मेरठ पोलिसांनी शहरातील रहिवाशांसाठी एक परिपत्रक जारी केले ज्यामध्ये रस्त्यावर नमाज अदा केली जाणार नाही असे म्हटले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई होऊ शकते. २८ मार्च रोजी रमजानच्या शेवटच्या शुक्रवारच्या नमाज आणि ईद-उल-फित्रसाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
मुनव्वर फारुकीने विचारला एक प्रश्न
हे परिपत्रक जारी होताच मुनावर फारुकी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून ही बातमी शेअर केली. यासोबतच त्यांनी लिहिले की, ‘हे’ ३० मिनिटांच्या नमाजसाठी तुम्ही हे करताय ?’ काय आता भारतातील कोणतेच सण रस्त्यांवर होणार नाहीत का? विनोदी कलाकाराची ही पोस्ट त्याच्या इन्स्टा स्टोरीवर आहे. आणि या पोस्टमुळे चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
Kunal Kamra: कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढ, कॉमेडियनवर तीन गुन्हे दाखल!
मुनव्वर फारुकी उमरा करण्यासाठी आला होता
रमजानच्या निमित्ताने मुनव्वर फारुकी नुकतेच उमरा करण्यासाठी मक्का येथे पोहचला होता. यावेळी त्याने त्याचे काही फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबत दिलेले कॅप्शन असे होते, ‘मक्का, जगातील सर्वात सुंदर ठिकाण.. अल्लाह सर्वांना इथे बोलावतो, मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना केली आहे, तुम्हीही तुमच्या प्रार्थनेत माझी आठवण ठेवा.’ मुनावर फारुकी हे त्यांची पत्नी महजबीन कोतवालासोबत आले होते.