(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
२०२१ मध्ये विभक्त झालेल्या समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी बीआरएस नेते केटी रामाराव यांना माजी जोडप्याच्या घटस्फोटाचे कारण सांगितले होते. सुरेखाचे हे वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सेलिब्रिटींनी तिच्यावर जोरदार टीका केली. नागा चैतन्य आणि सामंथा यांनीही असे वक्तव्य केल्याबद्दल मंत्र्याला फटकारले. आणि यानंतर नागार्जुन यांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली.
कोंडा सुरेखा यांच्यावर केला गुन्हा दाखल
सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर टिप्पणी केल्याबद्दल नागार्जुन यांनी मंत्री सुरेखा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. अभिनेता नागा चैतन्यने एफआयआरची कॉपी एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती. एफआयआर दाखल करण्यापूर्वी नागार्जुनने त्यांना खूप खडसावले होते. अभिनेत्याने एफआयआर दाखल केल्यानंतर या मानहानीच्या खटल्याची सुनावणी मंगळवारी (8 ऑक्टोबर 2024) नामपल्ली महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू झाली. ही सुरु होताच अभिनेता नागार्जुनने तिथे हजेरी लावली.
नागार्जुन न्यायालयात झाले हजार
अभिनेता न्यायालयात उपस्थित होताच कोर्टाने नागार्जुन आणि त्यांची भाची सुप्रिया यांचे विधान ताबोडतोब नोंदवून घेतले. याचदरम्यान, नागार्जुन त्यांची पत्नी अभिनेता नागार्जुन यांनी न्यायालयाला माहिती दिली की कोंडा सुरेखा यांनी त्यांच्या कुटुंबाविरुद्ध केलेल्या टिप्पण्यांमुळे देशभरात प्रचंड चर्चा सुरु असून माझ्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठीच अभिनेत्याने त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे असे सांगितले.
पुढे अभिनेत्याने सांगितले की, अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत त्याच्या मुलाच्या घटस्फोटावर अपमानास्पद टिप्पण्या त्यांनी दिल्या असून या दोघांच्या कामावर या सगळ्याचा परिणाम झाला आहे. मंत्र्यांच्या टिप्पण्यांमुळे ग्लॅमर क्षेत्रात या दोघांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आणि कोंडा सुरेखा यांच्या समाजसेवेतील भूमिकेमुळे प्रचंड आदर असलेल्या प्रतिमेला यामुळे धक्का बसला आहे. असे त्यांनी सांगितले. तसेच नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा विरुद्ध कारवाई सुरू करण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केली आहे.
हे देखील वाचा- अनन्या पांडे करणार असे लग्न, स्वतःच केला खुलासा! म्हणाली, मला…
कोंडा सुरेखा यांनी विधानाबद्दल माफी मागितली
आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टार्गेट करण्यासाठी चित्रपटातील कलाकारांचा वापर केल्याबद्दल नागार्जुनने सुरेखाला फटकारले होते. इतरांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंतीही त्यांनी केली. अशा विधानांना खोटे आणि मूर्खपणाचे ठरवल्यानंतर त्यांनी सुरेखाला तिचे वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. नंतर, एक निवेदन जारी करून, मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आणि सामंथा यांची माफी मागितली.