(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
CTRL हा ओटीटी रिलीज चित्रपटामुळे सध्या अनन्या पांडे चर्चेत आहे. अभिनेत्री या चित्रपटाच्या अभिनयासाठी लोकांच्या प्रशंसा मिळवत आहे. CTRL मधील तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेडे केले आहे. खो गए हम कहाँ आणि कॉल मी बे नंतर CTRL या चित्रपटाने अभिनेत्रीची वेगळीच ओळख चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे. तसेच अभिनेत्रीच्या आदित्य रॉय कपूरच्या ब्रेकअपनंतर आणि वॉकर ब्लॅन्कोला डेट केल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता अभिनेत्रीने तिच्या लग्नाबाबत योजनेचे स्पष्टीकरण दिले आहे. ती रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नापासून खूप प्रेरित झाली आहे.
अलीकडेच अनन्याने आलिया आणि रणबीरच्या चकित करणाऱ्या घरगुती लग्नाविषयी माहिती दिली. तिने असेही व्यक्त केले की तिला अशा लग्नाचे स्वप्न आहे आणि तिचे स्वतःचे लग्न रणबीर-आलियासारखे जादुई व्हावे अशी तिची इच्छा आहे, जे बॉलीवूडच्या उत्सवांचे आकर्षण दर्शवेल आणि चाहत्यांना चकित करेल.
गलाट्टा इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अनन्या पांडेने स्वतःच्या लग्नाच्याबाबतीत आलिया आणि रणबीरचा आदर्श समोर ठेवला आहे. आणि तिने तिच्या लग्नाच्या योजनेची चर्चा केली आहे. आलिया आणि रणबीरचे लग्न पाहून तिला सुद्धा असेच लग्न कराचे आहे असे अभिनेत्रीने सांगितले. पुढे अभिनेते स्वतःसाठी चांगली निवड कशी करतात याबाबत अनन्याने सांगितले. आणि आलिया आणि रणबीरने एकमेकांची निवड केली असे ती म्हणाली. यानंतर अनन्याने सांगितले की तिला देखील असाच जोडीदार हवा आहे जो तिची निवड करेल आणि आनंदी ठेवेल.
साधे परंतु अविस्मरणीय अशी लग्नाची इच्छा व्यक्त करताना अनन्याला तिचे लग्न कुटूंब आणि मित्र मैत्रिणीं यांच्या उपस्थितीसह करायचे आहे असे देखील अभिनेत्रीने सांगितले. तसेच अभिनेत्रींचे लग्नापासूनचे स्वप्न आहे की तिला तिच्या स्वतःच्या लग्नात भरपूर मज्जा, मस्ती आणि डान्स करायचा आहे.
हे देखील वाचा- राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मानसी पारेख कॅमेऱ्यासमोर झाली भावुक, राष्ट्रपतींनी खांद्यावर हात ठेवून दिला आधार!
कामाच्या आघाडीवर, कॉल मी बे नंतर, अभिनेत्री अनन्या पांडे आता सीटीआरएल चित्रपटासाठी प्रशंसा मिळवत आहे. स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून फिल्मी दुनियेत प्रवेश करणारी अनन्या पांडे अलीकडेच कॉल मी बे या वेब सीरिजमध्ये दिसली. ही अभिनेत्रीची OTT प्लॅटफॉर्मवरील पहिलीच मालिका होती आणि तिने आपल्या वेगळ्या अवतारात चाहत्यांची मने जिंकली. आता ती CTRL या चित्रपटात दिसत आहे.