Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नाम फाऊंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न, ”नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याला सलाम”

’नाम फाऊंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न झाला, यावेळी सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2025 | 02:18 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

“जे जे जगी जगते तया, माझे म्हणा, करुणाकरा” या भावनेशी प्रामाणिक राहून ‘नाम फाऊंडेशन’ ही नामांकित संस्था गेली १० वर्षे पर्यावरण आणि विविध शाश्वत विकास क्षेत्रांमध्ये अविरत कार्यरत आहे. संस्थेचा दशकपूर्ती समारंभ नुकताच पुण्यात उत्साहात संपन्न झाला. पालखी नृत्याने तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत या सोहळ्याची सुरुवात झाली.

नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित या स्नेहमेळाव्यात माननीय श्री. नितीनजी गडकरी (केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री), चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य), पद्मभूषण डॉ. विजय भटकर (संगणक शास्त्रज्ञ), माननीय श्री. उदय सामंत (उद्योग/मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज ) आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.

‘दिवसाढवळ्या तो प्रायव्हेट पार्ट …’ सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीने आता केला खुलासा

‘नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित असून त्यांच्या या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेत सामाजिक कामासाठी पुढाकार घेतला तर ही सामाजिक चळवळ नक्कीच समाजात, देशात बदल घडवू शकते’, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. समस्यांचे रूपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवे, असे सांगताना चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असे सांगताना ‘नाम’ने केलेल्या कार्याचे आणि त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले. ‘देणारे हात होण्यापेक्षा मदत करणारे हात होता आलं पाहिजे’. जेवढ्या जास्त प्रमाणात आपण स्किल निर्माण करू तेवढे आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहू त्यासाठी समाजासाठी संवेदनशील असणाऱ्या प्रत्येकाने आपला खारीचा वाटा आवर्जून उचलायला हवा, असे प्रतिपादन नितीनजी यांनी केले.

असे विविध प्रयोग वेगवेगळ्या माध्यमांतून होणे महत्त्वाचे असून या प्रयोगांना सरकारी साखळीत सामावून घेणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं आहे. महिला वर्गासाठी ५ ते ६ तासांचे वर्क मॉड्युल तयार करत अधिकाधिक महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखविली.

“हा मराठी चित्रपटाचा विजय…”, अमराठी प्रेक्षकांनी केले ‘दशावतार’चं कौतुक; सिनेमागृहात अश्रू अनावर, पाहा VIDEO

‘नाम’ या संस्थेचे कामच त्यांच्या यशाची पावती आहे. अशा संस्थांचा नावलौकिक सर्वत्र व्हावा यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. शासनसोबतही अनेक कार्यक्रमांतून आणि योजनांतून आम्ही नाम संस्थेला समाविष्ट केले आहे. याअंतर्गत अनेक चांगली कामे आजवर झाली आहेत. ज्याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचे उदयजी सामंत यांनी यावेळी सांगितले.

सप्टेंबर २०१५ साली ‘नाम फाऊंडेशनची’ स्थापना झाली. आज फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. या वाटचालीत आजवर असंख्य हातांनी माणूसकीच्या या यज्ञात मोठे योगदान दिले. मानवतेचा हा यज्ञ यापुढेही असाच अखंडपणे चालत राहील, यासाठी ‘नाम फाऊंडेशन’ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नाम चे संस्थापक-अध्यक्ष नाना पाटेकर आणि संस्थापक-सचिव मकरंद अनासपुरे यांनी यावेळी केले.

Web Title: Nana patekar and makrand anaspure naam foundation decade long journey of social service naam foundation celebrated its decade anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 12:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.