(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दशावतार’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हागभरून या चित्रपटाला सिनेप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी ज्या पद्धतीने बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे त्यांची प्रशंसा केली जात आहे. ‘दशावतार’च्या टीमकडून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत. यातील एका अमराठी प्रेक्षकाने संपूर्ण स्टारकास्टचे कौतुक केले आणि चित्रपटाला कमाल म्हटले आहे.
‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…
‘दशावतार’ चित्रपट पाहून सिनेमागृहातून बाहेर पडताना भाऊक झालेले प्रेक्षक पाहायला मिळाले आहे. चित्रपटाचा प्रभाव सिनेमा बाहेर देखील पाहायला मिळाला आहे. फक्त मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकदेखील मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. आणि या चित्रपटाला दाद देत आहेत. प्रेक्षक हा चित्रपट फक्त पाहतच नाही तर या सिनेमाचं कौतुक करतानादेखील दिसून आले आहेत. तसेच एका अमराठी प्रेक्षकांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अमराठी प्रेक्षकाचा व्हिडीओ व्हायरल
‘दशावतार’च्या टिमने एका अमराठी चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर अश्रू अवावर झालेला हा प्रेक्षक हिंदीत बोलताना दिसला की, “मी अमराठी आहे. जुहूवरुन मी हा चित्रपट पाहण्यासाठी खास आलो आहे. यावेळी एक गोष्ट मला सांगायची आहे की, दिलीप प्रभावळकर सर महान अभिनेते आहेत. आमचा त्यांना सॅल्युट. आम्हाला मराठी चित्रपट आणि तुम्ही सगळे खूप आवडले आहेत”. दरम्यान उपस्थितीत सर्व प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटासह स्टँडिंग ओव्हेशनदेखील दिले आहे. तसेच या अमराठी प्रेक्षकाने खूर्चीवर चढून मोठ-मोठ्याने टाळ्या वाजवत स्टँडिंग ओव्हेशन दिले. या प्रेक्षकांचं प्रेम पाहून नक्कीच मराठी चित्रपटाला चांगला दर्जा मिळत असल्याचे दिसते आहे.
‘सचिन मला सिनिअर आहे…’ पिळगांवकरांबद्दल काय म्हणाले दिलीप प्रभावळकर? उत्तर ऐकून व्हाल चकीत
‘दशावतार’च्या टीमने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमाल चित्रपट, मराठी कलाकारांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद, अप्रतिम चित्रपट, सर्वच कलाकारांचं मनापासून कौतुक, दिलीप प्रभावळकर सर तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी दिल्या आहेत. एकीकडे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही, अशी चर्चा असताना ‘दशावतार’ या चित्रपटाचे शो वाढवण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अमराठी प्रेक्षक बॉलीवूड चित्रपट पाहण्यापेक्षा खास हा मराठी चित्रपट पाहणं जास्त पसंत करत आहेत. तसेच ही मराठी इंडस्ट्रीसाठी एक महत्वाची बाब आहे.
‘दशावतार’ चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल हे कलाकार ‘दशावतार’ यांसारख्या कलाकारांचे काम पाहायला मिळाले आहे. सुबोध खानोलकरने ‘दशावतार’चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. सिनेमाचे संवाद आणि यातील गीते गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे.