(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानने नुकतेच एका मुलाखतीत इटलीमध्ये तिच्यासोबत झालेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितले, इटलीत तिला दिवसाढवळ्या एका अनोळखी पुरुषाने सार्वजनिक ठिकाणी त्रास दिला. या घटनेमुळे ती हादरली होती. अभिनेत्रीने आता या सगळ्याचा खुलासा केला आहे. तसेच या तिच्यासोबत नक्की काय झाले हे आपण जाणून घेणार आहोत.
‘सचिन मला सिनिअर आहे…’ पिळगांवकरांबद्दल काय म्हणाले दिलीप प्रभावळकर? उत्तर ऐकून व्हाल चकीत
सोहा हॉटर्फ्लाय या माध्यमाशी संवाद साधताना म्हणाली, जेव्हा अभिनेत्रीला मुलाखतीत विचारले की कधी सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश केले गेले आहे का? यावर अभिनेत्री म्हणाली, “हो, इटलीत माझ्यासोबत असं झालं होतं ते पण दिवसाढवळ्या. एक व्यक्ती प्रायव्हेट पार्ट दाखवत होता. मला कधीच कळलं नाही की यामागचा हेतू काय असतो. अशा व्यक्तींच्या मनात काय चालू असते, हे जाणून घ्यायची इच्छा देखील होत नाही.”
या अनुभवाबद्दल बोलताना सोहा पुढे म्हणाली की ती स्वतःला भाग्यवान समजते. कारण बऱ्याचदा अनेक महिलांना अशा गोष्टींना रोज सामोरे जावे लागते आणि त्यांच्याकडे कोणताही आधार नसतो. तसेच, पुढे सोहाला विचारण्यात आले की बॉलीवूडमध्ये काम करताना तिला कास्टिंग काउचचा अनुभव आला का? यावर अभिनेत्री म्हणाली, “नाही. कदाचित माझ्या बाबतीत हे सगळं माझ्या पार्श्वभूमीमुळे टळलं आहे. लोकांना माहिती होतं की मी सैफ अली खानची बहीण आहे, शर्मिला टागोर माझी आई आहे. त्यामुळे कोणी माझ्याकडे तसं वागलं नाही. यासाठी देवाचे आभार मानते.”
सोहा अली खानची कारकीर्द
सोहा अली खानने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रंग दे बसंती’, ‘खोया खोया चाँद’, ‘तुम मिले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ती अभिनयापासून दूर राहिलेली दिसली आहे. २०१८ मध्ये ती शेवटची ‘साहेब बीवी और गँगस्टर ३’ मध्ये दिसली होती. आता सात वर्षांच्या ब्रेकनंतर ती पुन्हा ‘छोरी २’ या हॉरर-थ्रिलर चित्रपटातून परतली आणि प्रेक्षकांना चकीत केले. या चित्रपटात तिच्यासोबत नुसरत भरुच्चा, गश्मीर महाजनी आणि जितेंद्र कुमार देखील मुक्या भूमिकेत दिसले आहेत.