(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा एकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच, अभिनेत्रीने स्वतःच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त, तिने एका कार्यक्रमात असा पोशाख घातला की सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. काही लोक तिच्या वयाच्या मानाने तिची स्टाईल अयोग्य म्हणत आहेत, तर तिचे चाहते तिच्या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.
नीना गुप्ताच्या ड्रेसवरून सुरु झाला वाद
नीना गुप्ता ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये स्जभागी झाल्या होत्या. जिथे त्यांनी मीडियासोबत केक कापला आणि तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा रन कफ्तान आणि सोनेरी ब्लाउस स्टाइल टॉप घातला होता, जो तिची मुलगी मसाबा गुप्ताच्या फॅशन ब्रँड ‘हाऊस ऑफ मसाबा’चा होता. काही लोकांना तिचा हा लूक खूप बोल्ड वाटला आणि त्यांनी सोशल मीडियावर नीना यांना ट्रोल करायला सुरुवात केली. तर काही चाहते त्यांचे कौतुक करताना दिसले आहे.
नीना गुप्ता यांना ट्रोल करण्यात आले
ट्रोलर्सनी तिच्या वयानुसार कपडे न घालण्यासारख्या कमेंट केल्या. पण या टीकेदरम्यान, अनेक चाहते पाठिंबा देण्यासाठी पुढे आले. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आम्हाला महिलांनी आत्मविश्वास बाळगावा अशी अपेक्षा आहे पण जेव्हा एखादी महिला तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगते तेव्हा तिला लाज वाटते.’ तर दुसऱ्याने म्हटले, ‘मुद्दा कपड्यांबद्दल नाही, तर स्वतःच्या अटींवर तुमचे जीवन जगण्याचा आहे.’
नीना गुप्ता यांची स्पष्टवक्ती शैली
नीना गुप्ता यांनी त्यांच्या धाडसी आणि स्पष्टवक्ते शैलीने समाजाने घालून दिलेले नियम अनेक वेळा मोडले आहेत. वैयक्तिक आयुष्यात लग्न न करता आई होण्याचा निर्णय असो किंवा पारंपारिक भूमिकांपलीकडे जाऊन चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय असो, नीना नेहमीच स्वतःच्या अटींवर जगल्या आहेत. आणि अभिनेत्रीने नेहमीच स्वतःच्या इच्छेप्रमाणे राहिली आहे.
अभिनेत्री नीना गुप्ता सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नीनासोबत, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि दिग्दर्शक अनुराग बसू हे चित्रपटातील इतर कलाकार देखील या कार्यक्रमात दिसले. ‘मेट्रो… इन दिनो’ हा चित्रपट नातेसंबंध, लग्न आणि आजच्या पिढीच्या विचारसरणीवर आधारित चार कथांचा संग्रह आहे, जो ४ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
नीना गुप्ताला ट्रोल करणारे लोक हे विसरतात की ती केवळ एक अभिनेत्री नाही तर समाजातील रूढींना आव्हान देणार एक परिपूर्ण उदाहरण आहे. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते यि म्हणजे ‘वय काहीही असो, आत्मविश्वासात कोणतीही तडजोड केली जाऊ नये.’