
फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाली नेहल वडोलिया?
राजस्थान रॉयल्स संघात खेळणारा एक घटस्फोटित क्रिकेट खेळाडूने नेहलला मेसेज करून-करून त्रास दिला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या नेहलने घटित सगळी माहिती या पॉडकास्टदरम्यान सांगितली आहे. नेहल म्हणते की, “क्रिकेटपटू राजस्थान रॉयल्सचा आहे. तो घटस्फोटित आहे. मी आताही त्याचे मेसेज तुम्हाला दाखवू शकते.” पुढे ती म्हणते “मी आता जरी त्याला मेसेज केला ना तर तो मला पुन्हा वारंवार मेसेज करायला सुरुवात करेल. माझ्या Whatsapp Status वर मला ‘Hot, Beautiful तसेच Pretty’ असे काही ना काही लिहून पाठवत असतो. मी त्याला अनेकदा म्हणाली आहे की ‘का मला तू मेसेज करत आहेस? मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी!’ तेव्हा कुठे तो चार दिवस थांबत असेल मग पुन्हा तो या गोष्टी करण्यास सुरुवात करतो. या गोष्टींना कंटाळून मी त्याला ब्लॉक करून टाकलं आहे.” या चर्चेत अभिनेत्रीने त्या खेळाडूचे नाव जाहीर केले नाही.
एका व्यक्तीने घरापर्यंत केले Follow
नेहल पुढे सांगते की, “मी तोंडाला मास्क लावून घराबाहेर पडते. एकदा मी बाजारात गेली असताना. एक व्यक्ती मला follow करत असल्याचा मला भास झाला. तो व्यक्ती खरंच मला follow करत होता. त्या व्यक्तीने अगदी मी माझ्या घरात परतेपर्यंत माझा पाठलाग केला.” नंतर त्यानेच येऊन मला सांगितलं की, “मी तुमचा पाठलाग करतोय. मी तुमचा फार मोठा चाहता आहे. मी तुम्हाला सोशल मीडियावरपण Follow करतो आणि आता इथेही करत होतो.”
कोण आहे Nehal Vadoliya?
Nehal Vadoliya ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जी प्रामुख्याने OTT वेब सीरिजमधील कामासाठी ओळखली जाते. तिने 2018 मध्ये अभिनय क्षेत्रात सुरुवात केली आणि नंतर “Gandii Baat”, “Mastram”, “Julie”, “Dunali” यांसारख्या लोकप्रिय वेब सीरिजमधून प्रसिद्धी मिळवली. तिने टीव्ही शो आणि काही एपिसोडिक भूमिकांमध्येही काम केले असून तिचा अभिनय OTT प्लॅटफॉर्मवर विशेष चर्चेत राहिला आहे.ती गुजरातच्या जामनगर येथील असून मॉडेलिंगमधून तिने करिअरची सुरुवात केली होती.