निकिता दत्ताच्या शाहरुख खानवरील प्रेमाला काही सीमा नाही. वेळोवेळी, प्रतिभावान अभिनेत्रीने शाहरुख खानवर तिचे प्रेम व्यक्त केले आहे आणि अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामधील ‘मेहंदी लगा कर रखना’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. अभिनेत्री अझरबैजानच्या बाकूमध्ये तिचा वेळ एन्जॉय करताना दिसली. जेव्हा तिने एका दुकानाला भेट दिली जिथे दुकानदाराने ‘मेहंदी लगा कर रखना’ हे गाणे वाजवले. शाहरुख खानची डाय-हार्ड फॅन असलेली ही अभिनेत्री दुकानात उभी राहून नाचू लागली.
अभिनेत्रीने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “प्रेमाला एक परिपूर्ण भाषा आहे ज्याला शाहरुख खान म्हणतात. हे बाकूमधील बाकलावाचे दुकान आहे! या व्यक्तीकडे त्यांच्या गाण्यांनी भरलेली संपूर्ण प्लेलिस्ट होती.” असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. निकिता दत्ताने सुपरस्टार शाहरुख खानला ‘युनिव्हर्सल लव्ह लँग्वेज’ म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला निकिताने शाहरुख खानसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. “नक्कीच, शाहरुख खान साठी मी नेहमीच प्रभावित होते आणि मी त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे,” असे अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती.
हे देखील वाचा- संतोष जुवेकरचा खतरनाक ‘रानटी’अंदाज पाहिलात का? सोशल मीडियावर लुकची जोरदार चर्चा
व्यावसायिक आघाडीवर, निकिता दत्ता लवकरच सिद्धार्थ आनंदच्या नेटफ्लिक्स प्रॉडक्शन ‘ज्वेल थीफ’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती बॉलीवूड स्टार सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अभिनेत्री अनेक नव्या प्रोजेट्समध्ये दिसणार असून, हे सगळे चित्रपट ती लवकरच जाहीर करणार आहे. चाहते तिच्या नवीन चित्रपटांची आणि नव्या भूमिकांची आतुरतेने वाट पाहत आहेत.