(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचं निधन होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत. शुक्रवारी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी, पंकज धीर यांच्या मुलाने निकितीन धीरने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने ‘दुःख’ आणि ‘गर्व’ विसरण्याबाबत लिहिले आहे.
पंकज धीर यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला, आणि सिनेसृष्टीतील एक तेजस्वी तारा कायमचा निखळला.पंकज धीर यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.त्यांच्या सन्मानार्थ १७ ऑक्टोबरला एक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. अंतिम संस्काराच्या वेळी सलमान खानही उपस्थित होता आणि त्याने निकितीनला मिठी मारून आधार दिला. प्रार्थना सभेत अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
निकितिन धीरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला, ज्यात देवी कालीका मातेचे पाय दिसत होते. त्या फोटोसोबत त्यांनी लिहिले, “त्यांच्या पायांमध्ये मी माझं नाव, माझा अभिमान आणि माझं दुःख ठेवलं, आणि त्यांनी मला आपलं म्हटलं.” हा फोटो स्टोरीवर शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
They Call Him OG ओटीटीवर कधी होणार प्रदर्शत? या OTT प्लॅटफॉर्मवर येणार पाहता
१७ ऑक्टोबर रोजी पंकज धीर यांच्या स्मृतीसाठी एक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती, ज्यात सुरेश ओबेरॉय, ईशा देओल आणि अनेक चित्रपटसृष्टीतील नामवंतांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात निकितिनची पत्नी कृतिका सेंगरही उपस्थित होती.
‘या’ कलाकाराने स्वतः ठरवली जन्माची तारीख,दसऱ्याशी खास नातं; ८ वर्षांपूर्वीच घेतला जगाचा निरोप!
पंकज धीर अनेक काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची तब्येत पुन्हा खराब झाली आणि मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे सह-अभिनेता फिरोज खान यांनी जाहीर केली. चाहत्यांना अश्रू अनावर झाल. पंकज धीर हे CINTAA, सिने आणि टीव्ही कलाकार संघटनेचे माजी सरचिटणीस होते. CINTAA ने देखील त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच आता त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.