Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण, राजकारण व साहित्याच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याची शोकभावना सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 12:03 PM
जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

Follow Us
Follow Us:

मुंबई : माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे काल सकाळी साडेआठ वाजता निधन झाले आहे. 11 नोव्हेंबर 1934 रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात व देशात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वाघमारे यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण, राजकारण व साहित्याच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याची शोकभावना सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

 

डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. वाघमारे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे काम केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पाया रचण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मराठवाडा विशेषतः लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लातूर पॅटर्न आणून एक शैक्षणिक क्रांती आणली आहे. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर सखोल लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली.

शिक्षण आणि साहित्य क्षेत्रासोबतच राजकारणातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. लातूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून लातूर शहराच्या विकासासाठी कार्य केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सरांचे शिक्षण क्षेञातील विचार व कार्य आणि समाजकारण- राजकारणातील नैतिक विचार व त्यासाठीचा आग्रह कायम स्मरणात राहिल. डॉ. जनार्दन वाघमारे सरांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक विश्वात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.

डॉ. जनार्दन वाघमारे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वाघमारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव कवठा (ता. औसा, जि. लातूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले भरीव व दूरदृष्टीपूर्ण कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा : 15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Web Title: Harshvardhan sapkal has reacted to the death of dr janardan waghmare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Congress
  • Death
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन
1

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
2

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
3

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.