(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
They Call Him OG हा पवन कल्याणचा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगला व्यवसाय केला, पण अपेक्षांवर पूर्ण उतरला नाही. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास तयार आहे.
हा चित्रपट Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 23 ऑक्टोबर 2025 पासून पाहता येणार आहे. फिल्मची ओटीटी रिलीज डेट समोर येताच चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. आता लोक या चित्रपटाच्या ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.या चित्रपटाने रिलीजच्या वेळी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं होतं. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने 90.25 कोटी रूपयांची कमाई केली होती.
25 सप्टेंबर रोजी थिएटर्समध्ये रिलीज
पवन कल्याणच्या चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळते. या चित्रपटात पवन कल्याणसोबतच इमरान हाशमीही मुख्य भूमिकेत आहे. ही फिल्म 25 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाली होती. आता ही फिल्म ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, आता पाहायला हवं की ओटीटीवर या चित्रपटाला काय प्रतिसाद मिळतो.अपेक्षा आहे की ओटीटीवर येताच ही फिल्म प्रचंड लोकप्रिय होईल. त्याच्या रिलीजची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
They Call Him OG ही पवन कल्याण अभिनीत एक एक्शन थ्रिलर फिल्म आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने 90.25 कोटी रुपयांचा जोरदार व्यवसाय केला, पण त्यानंतरची अपेक्षा तशी पूर्ण झाली नाही.आता “They Call Him OG” हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2025 पासून नेटफ्लिक्सवर पाच भाषेत पाहायला मिळणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये पाहायला मिळणार आहे. ओटीटीवर येताच या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.