(फोटो सौजन्य - Instagram)
‘छोटी सरदारनी’ मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली आणि बिग बॉस फेम अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालियाने अलीकडेच कायद्याची विद्यार्थिनी असताना तिला आलेल्या वेदनादायक अनुभवांबद्दल सांगितले. या घटनेची आठवण करून देताना, निमृतने खुलासा केला की भारताच्या सर्वोच्च न्यायालयात तिचा विनयभंग झाला होता. हे ठिकाण तिला सर्वात सुरक्षित वाटत होते. परंतु एका घटनेनंतर तिला या ठिकाणाबद्दल असुरक्षितता वाटू लागली.
निम्रत कौर अहलुवालिया पुढे म्हणाली की, ‘सर्वोच्च न्यायालयात एका वरिष्ठ वकिलांची सुनावणी सुरू असताना माझा विनयभंग केला, लैंगिक छळ केला. मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात होते आणि एका हाय-प्रोफाइल प्रकरणात साक्ष देण्यासाठी न्यायालयात गेले होते. कोर्टरूम भरपूर गर्दीने भरलेला होता, न्यायाधीश उपस्थित होते. माझा छळ होणारी मी एकटीच नव्हते.”
निम्रत कौर अहलुवालियाला न्यायालयात असभ्य वागणूक देण्यात आली.
निम्रत म्हणाली की, माझ्या मित्राचा मित्र एक कायदेशीर सल्लागार आहे त्याच्या मदतीने मी न्यायालयात प्रवेश केला. या सर्वाची सुरुवात एका चांगल्या ओळखीतून झालेली. पण नंतर या गोष्टी वेदनादायक आठवणीत बदलत गेल्या. निमृत म्हणाली, ‘ चांगल्या मुखवट्या आड तो विकृत माणूस होता, सर्वात आधी मला माझ्या पाठी नितंबांवर माझा हात जाणवला. मला वाटले की मी जास्त विचार करत आहे. ते खूप गर्दीचे ठिकाण होते. मी मागे वळून पाहिले तर तो सरळ समोर पाहत होता, मला ओळखतही नव्हता. पण तरीही तो ते करत राहिला.’
निम्रत कौर अहलुवालिया खूप रडली
निम्रत पुढे म्हणाली, ‘मी दुसऱ्या ठिकाणी गेले होते. तो माझ्या मागे आला. त्याने माझ्या हाताला स्पर्श केला, नंतर पुन्हा माझ्या नितंबांवर स्पर्श केला. मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. जवळच उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ महिला वकिलाने निम्रतची अस्वस्थता लक्षात घेतली.
त्या माणसाने दुसऱ्या महिलेशीही असेच केले
निम्रत कौर अहलुवालिया म्हणाली, ‘तिने विचारले की मी ठीक आहे का आणि त्या माणसाकडे बोट दाखवले. मी होकार दिला तेव्हा तिने मला सांगितले की त्याने त्या दिवशी तिचाही विनयभंग केला होता.’ महिलेने लगेच निम्रतला बाहेर काढले, त्या माणसाला चापट मारली आणि अधिकाऱ्यांना फोन केला. तसे पोलीस आले. ती म्हणाली, ‘मी घाबरली होती कारण मला वाटले की मी सर्वात सुरक्षित ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयात जिथे प्रत्येक गुन्ह्यावर न्याय मिळतो. आणि तरीही, हे घडले.’ निमृतला आरोप लावायचे होते, परंतु नंतर तिला वाटले की त्याने लेखी माफी मागावी आणि त्या माणसाने तिच्याशी जे केले ते मान्य केले.