
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘जो सलमानसोबत काम करणार तो मरणार…’, बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मिळाली धमकी; ऑडिओ व्हायरल
काय आहे चित्रपटाची कथा?
‘निशांची’ दोन भावांमधील गुंतागुंतीचे आणि अशांत नातं दाखवणार आहे. दोघांच्याही आयुष्यात नाट्यमय वळणे येतात. दोघेही वेगवेगळ्या मार्गांवर जातात. टीझरमध्ये देसी शैली पाहायला मिळत आहे. यात बंदुका, गोळ्या, रोमान्स आणि ॲक्शन हा सगळा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाच्या टीझर प्रेक्षकांचं चांगलाच लक्ष वेधलं आहे.
टीझरमध्ये काय खास आहे?
टीझरची सुरुवात एका व्यक्तीने होते, ‘बॉलीवूडशिवाय कोणी कसे आयुष्य जगू शकते?’ यानंतर, टीझरमध्ये संगीत, नृत्य आणि ॲक्शन दिसते. टीझरमध्ये ऐश्वर्य ठाकरे बबलूच्या भूमिकेत दिसत आहे. तो त्याच्या स्वतःच्या शैलीत आणि वेगळ्या दृष्टिकोनातून जगतो. चित्रपटात वेदिका पिंटो देखील दिसते. वेदिका पिंटो ऐश्वर्य ठाकूरसोबत हातात हात घालून चालते. दोघांची केमिस्ट्री खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे.
धनुषसोबतच्या डेटिंग अफवांदरम्यान मृणालने अभिनेत्याच्या गाण्यावर केला डान्स, बहिणींनादेखील केले फॉलो
टीझरमध्ये दिसणारे अनेक कलाकार
यानंतर, टीझरमध्ये डब्लूची एन्ट्री होते. बबलू जितका खराब आहे तितकाच डब्लू हा सुसंस्कृत आहे. त्यांच्याशिवाय टीझरमध्ये मोहम्मद झीशान अय्युब दिसतो. कुमुद मिश्रा देखील उत्कृष्ट अभिनय करताना दिसणार आहे. ‘निशांची’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.