(फोटो सौजन्य - Instagram)
पंचायत मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे ११ जून रोजी ठीक १२ वाजता ‘पंचायत सीझन ४’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यावेळी ‘पंचायत’च्या नवीन सीझनमध्ये निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळणार आहे. ही वेब सिरीज चाहत्यांची पसंतीस उतरली आहे. नव्या भागाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की यावेळी फुलेरा येथे पुन्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. क्रांती देवी आता निवडणुकीत मंजू देवी यांच्या विरोधात उभ्या राहताना दिसणार आहेत आणि संपूर्ण फुलेरा पुन्हा दोन भागात विभागला जाणार आहे.
ट्रेलरमध्ये दिसली सेक्रेटरी आणि रिंकीची प्रेमकहाणी
यावेळी कथेमध्ये पुन्हा एकदा सेक्रेटरी जी आणि रिंकीच्या प्रेमकथा दाखवली जाणार आहे. एकीकडे निवडणुकीची तयारी सुरू होईल, तर दुसरीकडे सेक्रेटरी जी आणि रिंकीचा कथाही पुढे जात आहे. गेल्या ३ सीझनपासून हे दोघे एकमेकांबद्दल असलेल्या भावना मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघेही एकमेकांना आवडतात, पण ते उघडपणे व्यक्त करत नाही आहेत. आता ट्रेलरमध्ये दोघेही भविष्याबद्दल बोलताना दिसत आहेत. चौथ्या सीझनमध्ये, सेक्रेटरी जी आणि रिंकीची प्रेमकथा फुलेरामध्ये नक्कीच चर्चेचा विषय होणार आहे.
मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात वाद
याशिवाय, ट्रेलरमध्ये मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात पुन्हा एकदा प्रचंड तणाव दिसून आला आहे. दोघेही प्रधानच्या खुर्चीसाठी समोरासमोर लढताना या सीजन मध्ये दिसणार आहे. आणि तसेच गावकऱ्यांची मते मिळवण्यासाठी या दोघीही सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहेत. संपूर्ण फुलराला आकर्षित केले जाईल आणि मते मिळविण्यासाठी अनेक कट रचले जातील. तसेच हे सगळं सुरु असताना या भागात आमदार पुन्हा एकदा परताना दिसणार आहे आणि ते पुन्हा एकदा सर्वांना त्यांच्या तालावर नाचवणार आहे. ट्रेलरमध्ये, कधी सचिवांना मारहाण होताना दिसते, तर कधी स्वतः प्रधान यांना. हे सर्व पाहून असे वाटते की या निवडणुकीत प्रधानजींचे वर्चस्व कमी झाले आहे.
‘पंचायत सीझन ४’ कधी प्रदर्शित होणार?
आता रिंकी तिच्या आईला निवडणूक जिंकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तिचे प्रयत्न यशस्वी होईल की नाही? हे मालिका प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहे. मंजू देवी निवडणूक जिंकली तरच सचिव जी देखील फुलेरामध्ये राहतील. आता कोण जिंकणार? हे २४ जून रोजी उघड होणार आहे. कारण २४ जून रोज ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच ‘पंचायत सीझन ४’ ची रिलीज तारीख आधी २ जुलै होती आता ती तारीख बदलून प्रेक्षकांसाठी २४ जून करण्यात आली आहे. ट्रेलरसोबतच नवीन तारीखही जाहीर केली आहे.