(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा लाडका मुलगा इब्राहिम अली खानने ‘नादानियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. आता आणखी एका महान अभिनेत्याच्या मुलीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. हे दुसरे तिसरे कोणी नसून पंकज त्रिपाठी आहेत ज्यांची मुलगी आशी त्रिपाठी अलीकडेच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. त्यांचा ‘रंग दारो’ हा म्युझिक व्हिडिओ १३ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने रिलीज झाला होता, जो आता खूप लक्ष वेधून घेत आहे. मुलगी आशीला पडद्यावर पाहून पंकज त्रिपाठी भावुक झाले.
Sikandar: ‘नाचे सिकंदर’ टायटल सॉंगवर केला सलमाने जबरदस्त डान्स, ‘सिकंदर’ चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज!
मुलीला पडद्यावर पाहिल्यानंतर पंकज त्रिपाठी काय म्हणाले?
पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अलिकडच्या मुलाखतीत त्यांची मुलगी आशी त्रिपाठीच्या पदार्पणाबद्दल सांगितले. अभिनेता म्हणाला की, अशीला पडद्यावर पाहणे हा माझ्यासाठी आणि माझी पत्नी मृदुलासाठी खूप भावनिक आणि अभिमानाचा क्षण होता. आशीला नेहमीच कला सादर करण्याची आवड होती. तिच्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिला इतक्या नैसर्गिक भावनेने पाहणे खरोखरच खास होते. ‘जर तिची पहिली सुरुवात अशी असेल, तर मी तिचा पुढील प्रवास पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.’ असे अभिनेत्याने म्हटले आहे.
म्युझिक व्हिडिओमुळे आशी चर्चेमध्ये
आशी त्रिपाठीने तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओ ‘रंग दारो’ मध्ये अप्रतिम अभिनय केला आहे. तसेच या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत प्रभाकर स्वामी दिसत आहेत. या गाण्याला मैनक भट्टाचार्य आणि संजना रामनारायण यांनी आवाज दिला आहे. तर अभिनव आर कौशिक यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. १३ मार्च रोजी रिलीज झालेल्या या गाण्याला युट्यूबवर ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
“ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा…” नागपूर हिंसाचारावर मराठमोळ्या अभिनेत्याची खरमरीत पोस्ट…
मुलगीही वडिलांच्या मार्गावर
सध्या पंकज त्रिपाठी यांची मुलगी आशी त्रिपाठी मुंबईतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिला तिच्या वडिलांप्रमाणे अभिनयात करिअर करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा संगीतकार अभिनव आर कौशिक यांनी मृदुला त्रिपाठी यांच्याशी संगीत व्हिडिओमध्ये आशीला कास्ट करण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी पंकज त्रिपाठी यांना विचारले आणि अभिनेत्याने ते मान्य केले.