hemant dhome react on nagpur violence
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरामध्ये काल (१७ मार्च) मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पाहायला मिळाला. औरंगजेबाच्या कबरच्या वादावरुन नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला. नागपुरातील महाल परिसर, हंसपुरी, मोमीनपुरा भागासह आसपासच्या परिसरात मोठ्या जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. उपस्थित जमावाकडून वाहनांची तोडफोड तसेच पोलीस दलावर देखील दगडफेक केली. जेसीबी जाळण्यात आला. यामुळे नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे नागपूर शहरातील झोन ३, ४ आणि ५ या भागांतील ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली.
“स्त्रियांना तुम्ही खालच्या दर्जाला ठेवता आणि पुरुषांना…”, अभिनेते सचिन पिळगावकरांचे वक्तव्य चर्चेत
नागपूरामध्ये काल झालेल्या हिंसाचार परिस्थितीवर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने भाष्य केले आहे. अभिनेत्याने खास सोशल मीडिया पोस्ट शेअर करत नागपूरकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे शेअर केलेल्या ट्वीटमध्ये म्हणतो की, “नागपूरकर आणि महाराष्ट्रातील तमाम समजुतदार नागरिकांना कळकळीची विनंती! कृपया शांतता आणि सलोखा जपा! ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा! ते चिथवतील, आपण शांततातेचा मार्ग धरायचा! ते बरळतील, आपण विचार सांगायचा! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जपायचा!” अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताना #जयमहाराष्ट्र या हॅशटॅगचाही वापर केला आहे. अभिनेत्याचीही एक्स पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नागपूरामध्ये काल (१७ मार्च) संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात हल्लेखोरांकडून तीन पोलिस उपायुक्तांवर गंभीर हल्ले झाले. हिंसा करणाऱ्यांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले ? गाड्या जाळल्या गेल्या, एका विशिष्ट ठिकाणी १००- १५० बाईक पार्क केल्या जायच्या, काल त्या ठिकाणी एकही गाडी पार्क नव्हती. याचाच अर्थ हा हल्ला पूर्वनियोजित होता का ? लोकं आपला जीव मुठीत धरून पळत होते. पोलीस येईपर्यंत अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. त्यांच्यावरही, कुऱ्हाडी आणि हत्यारांनी वार करण्यात आले.