
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जाह्नवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘परम सुंदरी’ २४ ऑक्टोबर २०२५ रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येईल.
चित्रपटाच्या कथेत, दिल्लीतील एक तरुण पुरुष ‘परम’ आणि केरळमधील ‘सुंदरी’ यांची प्रेमकहाणी दर्शवली आहे. या चित्रपटातील गाण्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे.जर तुम्ही अजूनही ‘परम सुंदरी’ बघितला नसेल, तर Prime Video वर उपलब्ध असलेल्या या चित्रपटाचा आनंद घ्या. हा चित्रपट २४ ऑक्टोबरपासून Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.
जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘परम सुंदरी’ तुम्ही प्राइम व्हिडीओवर मोफत पाहू शकता. आज प्राइम व्हिडीओने त्यांच्या इंस्टाग्रामवर जान्हवी आणि सिद्धार्थचे काही खास फोटो शेअर केले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीचा गैरफायदा, मुंबईत ४९ वर्षीय प्रसिद्ध संगीतकाराला अटक
आजपासून फ्रीमध्ये उपलब्ध!
तुषार जलोटा दिग्दर्शित ही रोमँटिक-कॉमेडी आता अमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. चित्रपट आधी १० ऑक्टोबर २०२५ रोजी ओटीटीवर रिलीज झाला होता, तेव्हा पाहण्यासाठी पैसे खर्च करावे लागत होते. पण आजपासून, अमेझॉन प्राइमच्या सब्सक्रायबर्ससाठी ती मोफत पाहता येईल.
Movie Collection :Thamma’ने ३ दिवसांत बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ! 5 मोठ्या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड
‘परम सुंदरी’ बद्दल
‘परम सुंदरी’ ही एक रोमँटिक ड्रामा प्रेमकथा आहे, ज्याचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे. ही चित्रपट दिनेश विजान यांच्या Maddock Films बॅनरखाली तयार करण्यात आली आहे. मुख्य भूमिका सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांनी साकारल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात संजय कपूर, तन्वी राम, रेन्जी पणिक्कर आणि अनेक इतर महत्त्वाचे कलाकारही आहेत.