(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘थामा’ प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसादही अत्यंत सकारात्मक आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू असून, चाहत्यांना या जोडीची केमिस्ट्री आणि अनोखा कथा-फॉर्म्युला खूप आवडला आहे.
फक्त तीन दिवसांतच ‘थामा’ने तब्बल ५५ कोटींची नेट कमाई केली आहे. या आकड्यामुळे ‘थामा’ने या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने पाच प्रमुख हिंदी चित्रपटांचे तीन दिवसांचे कलेक्शन ओलांडले आहे.
911 Nashville फेम अभिनेत्रीचे वयाच्या २३ व्या वर्षी निधन, १० वर्षांपासून ‘या’ आजाराशी सुरु होती झुंज
या यादीत ‘धडक 2’, ‘भूल चूक माफ’, ‘बागी 4’, ‘केसरी चॅप्टर 1’ आणि ‘सन ऑफ सरदार 2’ यांचा समावेश आहे. ‘धडक 2’ने तीन दिवसांत सुमारे ११.४ कोटी, ‘भूल चूक माफ’ने २८ कोटी, ‘बागी 4’ने ३१.२५ कोटी, ‘केसरी चॅप्टर 1’ने ३७.९ कोटी आणि ‘सन ऑफ सरदार 2’ने २४.७५ कोटींची कमाई केली होती. या सर्व चित्रपटांच्या तुलनेत ‘थामा’ने फक्त तीन दिवसांतच विक्रमी आकडा गाठला आहे.
“मिले सूर मेरा तुम्हारा” लिहिणारे अॅडमॅन पियुष पांडे यांचे निधन, ‘पद्मश्री’ने झाला होता गौरव
सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे चित्रपटाच्या कमाईला आणखी वेग मिळत आहे. ट्रेड विश्लेषकांच्या मते, ‘थामा’ लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करू शकतो. फॅन्स आणि समीक्षक दोघांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी त्याला “हॉरर-कॉमेडीचा नवा बेंचमार्क” असे संबोधले आहे.
थमा’ हा २०२५ साली प्रदर्शित झालेला हिंदी हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, जो ‘मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स’चा पाचवा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे, तर दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.






