
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती, राजकारणी राघव चढ्ढा यांनी त्यांच्या बाळाच्या जन्माच्या जवळजवळ एक महिन्यानंतर अखेर त्याचे नाव जाहीर केले आहे. या जोडप्याने २० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि इन्स्टाग्रामवर एका गोड संदेशासह ही बातमी शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले होते, “तो अखेर आला आहे, आमचा बाळ मुलगा. आणि आम्हाला आता खरोखरच पूर्वीचे आयुष्य आठवत नाही आहे.” जोडप्यांनी सुंदर नोट लिहून ही पोस्ट शेअर केली आहे आता त्याला अनेक कलाकारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले आहे आणि पोस्टमध्ये लिहिले, “जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् – तत्र एव नीर. जीवनाच्या अनंत थेंबात आमच्या हृदयांना शांती मिळाली. आम्ही त्याचे नाव ‘𝗡𝗲𝗲𝗿’ ठेवले – शुद्ध, दिव्य, अमर्याद.” हे नाव जाणून चाहते देखील आनंदी झाले आहेत. आणि कंमेंट करून चांगला प्रतिसाद देत आहेत.
सेलिब्रिटींनी जोडप्याचे केले अभिनंदन
परिणीती चोप्राने तिच्या मुलाच्या लहान पायांची झलक चाहत्यांना दाखवली आहे. परिणीती आणि राघवच्या पोस्टवर सेलिब्रिटी कमेंट करत आहेत आणि दोघांचे अभिनंदन करत आहेत. वरुण धवनने हार्ट इमोजी कंमेंट करून शेअर केली आहे. भारतीनेही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. निमरत कौरपासून ते कनिका कपूर, सबा पटौदी आणि गौहर खानपर्यंत सर्वांनी अभिनंदन केले आहे.
२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?
परिणीती आणि राघव यांनी एक महिन्यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्यांनी मुलाच्या जन्माची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली. २०२३ मध्ये उदयपूरमधील पिचोला तलावाजवळ परिणीतीने राघव चढ्ढासोबत स्वप्नातील लग्न केले. परिणीती ३७ वर्षांची आहे आणि राघव तिच्याच वयाचा आहे. दोघांनी काही महिने डेटिंग केले आणि नंतर ते एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. राघव हा आम आदमी पक्षाचा नेता आहे.