Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन; मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री

‘माया’ या मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटामधील नुकतेच नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्यामध्ये मुक्ता बर्वे आणि गिरीश ओक यांची अनोखी केमिस्ट्री दिसून आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 22, 2026 | 03:43 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाणं प्रदर्शित
  • मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री
  • ‘माया’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि भावस्पर्शी कलाकृतींसाठी ओळखला जाणारा आगामी चित्रपट ‘माया’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘मन गाईना सुरात’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, ते संगीतप्रेमींच्या मनात घर करू लागले आहे. आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा सकारात्मक संदेश देणारे हे गाणे ऐकताना एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता अनुभवायला मिळते आहे.

Zee Marathi Serial : अन्नपुर्णा आजी कामिनीच्या सणसणीत कानाखाली वाजवणार; कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट, पाहा प्रोमो

‘मन गाईना सुरात’ या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शब्द, संगीत आणि दृश्यांची अप्रतिम सांगड. कवी वैभव जोशी यांनी लिहिलेले अर्थपूर्ण आणि भावस्पर्शी शब्द मनाच्या कोमल भावना जागृत करतात. तर, या गाण्याला अंजली मराठे हिच्या सुरेल आवाजामुळे या शब्दांना एक खास उंची लाभली आहे. तिच्या आवाजातील कोमलता आणि भावनांची खोली गाण्याच्या आशयाला अधिक प्रभावी बनवते. पार्थ उमराणी यांनी दिलेले संगीत साधे, शांत आणि अंतर्मुख करणारे आहे. धून ऐकताच मनात एक प्रकारची प्रसन्नता आणि आशावाद निर्माण होतो.

 

गाण्याचे दृश्यांकनही तितकेच प्रभावी आहे. प्रकाश, रंगसंगती आणि हसऱ्या क्षणांची सुंदर मांडणी करत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. आयुष्यातील संभ्रम, मनाचे विविध विभ्रम आणि नात्यांतील सूक्ष्म भावना या गाण्यातून सुरेलपणे व्यक्त होतात. त्यामुळे हे गाणे केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न राहता अनुभवण्यासारखे ठरते.

Boss तान्या मित्तल अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “ह्यांना आवडेल का?”

दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या मते, “‘मन गाईना सुरात’ हे आमच्या चित्रपटातील अतिशय महत्त्वाचे गाणे आहे. कथानकातील काही अव्यक्त भावना आणि मनातील द्वंद्व या गाण्यातून सुंदरपणे मांडले गेले आहे.” त्यांच्या दिग्दर्शनातून भावनांचा सूक्ष्म वेध घेतला गेला असून, गाणे आणि कथा यांची एकसंधता स्पष्ट जाणवते. निर्माते नितीन वैद्य यांनीही या गाण्याबद्दल विशेष भावना व्यक्त करत म्हणाले की, “‘माया’मधील हे गाणे प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा देईल. कथानकाच्या निर्णायक टप्प्यावर येणारे हे गाणे चित्रपटाच्या भावविश्वाला आकार देते. साधे पण हृदयाला भिडणारे संगीत प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ राहील.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन यांच्या निर्मितीत साकारलेला ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, मुक्ता बर्वे, गिरीश ओक, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांसारखे दमदार कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या व्यक्तींच्या भावविश्वाचा सूक्ष्म आणि वास्तववादी वेध घेणारी कथा ‘माया’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

 

Web Title: Maya marathi movie song man gaina surat out on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज
1

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार!  DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची  सूट
2

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
3

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
4

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.