(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
चित्रपट अभिनेत्री अदिती मुखर्जीचे रस्ते अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीच्या या धक्कादायक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आदिती नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात एका नाट्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडली होती आणि वाटेतच एका भरधाव वाहनाने अभिनेत्रीच्या कॅबला धडक दिली. या दुर्दैवी अपघातात आदितीचा जीव गेला. आणि अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. आदिती मुखर्जीच्या निधनाची बातमी कळताच आता चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे, अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीने नुकतेच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत काम केले होते.
‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद
उपचारांदरम्यान अभिनेत्रीचे निधन
भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्या नंतर आदिती मुखर्जीला ग्रेटर नोएडा येथील शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना तिचा जीव वाचवता आला नाही आणि अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले. आदिती तिच्या घरातून नाट्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गौतम बुद्ध विद्यापीठात कॅबमधून प्रवास करत होती. आदितीच्या मृत्यूची माहिती मिळताच नाट्य कलाकारांनाही धक्का बसला आणि कार्यक्रमादरम्यान आदितीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
अदिती कोण होती?
आदिती मुखर्जी तिचा भाऊ अरिदम मुखर्जीसोबत दिल्लीतील महिपालपूर येथे राहत होती. आदितीचे कुटुंब ओडिशामध्ये आहे. आदिती अस्मिता थिएटरची माजी विद्यार्थिनी होती, जिथे तिने अभिनयाचे शिक्षण घेतले. अस्मिता थिएटरचे संचालक अरविंद गौर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आदितीच्या मृत्यूची बातमी शेअर केली. आदिती २०२२ च्या थिएटर बॅचमधील एक हुशार विद्यार्थिनी होती आणि ती खूप चांगली अभिनेत्री होती. आता आणखी एक अभिनेत्रीच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.
नाट्य दिग्दर्शकांनी दिली निधनाची बातमी
अरविंद गौर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अदिती सध्या बॉलिवूड अभिनेते आशुतोष राणा आणि राहुल भुचर यांच्या “हमारे राम” या नाटकावर काम करत होती. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अपघातात अदितीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर तिचे पालक ओडिशाहून दिल्लीला आले आहेत. अदितीचे निधन ही नाट्य जगतासाठी एक दुःखद बातमी आहे.






