(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
पायल कपाडियाचा ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी नामांकने देखील मिळाली आहेत. या चित्रपटाने ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार जिंकला. त्यानंतर ८२ व्या गोल्डन ग्लोबमध्ये त्याला नामांकन मिळाले, परंतु हा चित्रपट पुरस्कार जिंकण्यापासून वंचित राहिला. गोल्डन ग्लोबनंतर, पायल कपाडियाला आता प्रतिष्ठित डीजीए पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या बातमीने चाहते पुन्हा एकदा आनंदी झाले आहेत.
या श्रेणीमध्ये मिळालेले नामांकन
डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका (DGA) ने आगामी २०२५ च्या पुरस्कारांसाठी ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटासाठी पायल कपाडियाला नामांकन मिळाले आहे. पायलला दिग्दर्शक श्रेणीत पहिल्यांदाच हे नामांकन मिळाले आहे. कपाडिया सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – मोशन पिक्चरसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकू शकल्या नाहीत, त्यानंतर काही दिवसांनीच डीजीए अवॉर्ड्समध्ये तिच्या नामांकनाची बातमी समोर आली आहे.
या चित्रपटांधी स्पर्धा करतील
अमेरिकन चित्रपट उद्योग आणि परदेशातील चित्रपट आणि टीव्ही दिग्दर्शकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनोरंजन संघ, डीजीएने बुधवारी रात्री, ८ जानेवारी रोजी नामांकनांची घोषणा केली. पायल आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम व्यक्तींशी स्पर्धा करणार आहे. या श्रेणीतील इतर नामांकनांमध्ये ‘माय ओल्ड अॅस’ साठी मेगन पार्क, ‘निकेल बॉईज’ साठी रॅमेल रॉस, ‘आर्मंड’ साठी हाल्फडन उलमन टँडेल आणि ‘दीदी’ साठी शॉन वांग यांचा समावेश आहे, असे व्हरायटीने वृत्त दिले आहे.
कोणाची घरे जळून खाक झाली तर कोणी गमावले कुटुंब; लॉस एंजेलिसच्या आगीमुळे हॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण!
या ओटीटीवर चित्रपट पहा
‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ हा चित्रपट पायल कपाडिया यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. यात कानी कुश्रुती, दिव्या प्रभा, छाया कदम, हृदयु हारून आणि अझीज नेदुमंगड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट फ्रान्स, भारत, नेदरलँड्स आणि लक्झेंबर्ग येथील चार निर्मात्यांनी बनवला आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्हाला पाहता येईल.