
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“बिग बॉस सीझन १९” च्या ग्रँड फिनालेचे काउंटडाउन सुरू झाली आहे. विजेता ७ डिसेंबरच्या रात्री जाहीर होणार आहे. प्रेक्षक आतुरतेने या फिनालेची वाट पाहत आहेत. आणि अंतिम ट्रॉफी कोण उचलेल हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. काही जण गौरव खन्नाचे नाव घेत आहेत, तर काही जण फरहाना भट्ट आणि अमाल मलिकचे नाव घेत आहेत. परंतु, दुसराच कोणीतरी जिंकताना होणार असल्याचे समोर आले आहे. नवीनतम मतदानाचे ट्रेंड आश्चर्यकारक आहेत. आणि ते चाहत्यांना चकीत करणारे आहे.
‘Dhurandhar’ ने दोन दिवसात घातला धुमाकूळ; चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील, केला नवा रेकॉर्ड
सलमान खानच्या “बिग बॉस १९” च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये गौरव खन्ना, प्रणीत मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांचा समावेश आहे. त्यांचे प्रवासाचे व्हिडिओ दाखवण्यात आले आहेत आणि फरहाना भट्टच्या व्हिडिओला झी हॉटस्टारवर सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ५ डिसेंबर रोजी शेअर केलेला तिचा प्रोमो व्हिडिओ आतापर्यंत २,१०,००० वेळा पाहिला गेला आहे. दरम्यान, गौरव खन्नाच्या व्हिडिओला फक्त ८२,००० व्ह्यूज मिळाले आहेत. अमाल मलिकच्या व्हिडिओला १,१८,००० व्ह्यूज, तान्या मित्तलच्या व्हिडिओला १,६२,००० व्ह्यूज आणि प्रणित मोरेच्या व्हिडिओला ४८,००० व्ह्यूज मिळाले आहेत. पण मतदानाचे ट्रेंड वेगळेच सांगत आहेत.
‘बिग बॉस १९’ च्या शेवटच्या अंतिम फेरीतील वोट्स
‘बिग बॉस व्होट.इन’ नुसार, १५ व्या आठवड्याच्या अंतिम फेरीच्या दिवशी ‘बिग बॉस १९’ च्या ताज्या मतदानाच्या ट्रेंडमध्ये अमाल मलिक किंवा गौरव खन्ना हे दोघेही अव्वल स्थानावर नसल्याचे दिसून आले आहे. सकाळी ८:३० वाजेपर्यंत, प्रणित मोरे २५०,८९९ मतांसह आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर गौरव खन्ना १८८,५२३ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. याचा अर्थ ते सध्याच्या टॉप दोन मध्ये आहेत.
तान्या आणि अमाल पडणार घराबाहेर?
फरहाना १,४५,१४७ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तान्या मित्तल १,०४,१४३ मतांसह चौथ्या स्थानावर आहे आणि अमाल मलिक सर्वात कमी मतांसह पाचव्या स्थानावर आहे, त्याला फक्त २८,४५० मते मिळाली आहेत. या आधारावर शोचा विजेता नक्की कोण होईल हे अद्यापही समोर आलेले नाही आहे. परंतु, महाराष्ट्रातील मराठी मुलगा आघाडीवर असल्यामुळे वोट्स बदलण्याची शक्यता जास्त आहे.