(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
रितेश देशमुख, फरदीन खान, सीमा बिस्वास या बहुचर्चित नावांच्या यादीत आपल्या मराठमोळ्या अभिनेत्याचही नाव आता कौतुकाने आणि बरोबरीने घेतले जात आहे. मराठी प्रेक्षकांना याचा नक्कीच अभिमान आहे ही कौतुकाची बाब आहे. दिग्दर्शक कुकी गुलाटी याच्या मार्गदर्शनाखाली त्याने या चित्रपटात केलेल्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे. नचिकेत पूर्णपात्रे या अभिनेत्याने अनेक मराठी चित्रपटामध्ये, नाटकांमध्ये आणि मालिकेमध्ये काम केले आहे. त्याचा अभिनय कौश्यल्यामुळे हा अभिनेता चर्चेत आहे.
“विस्फोट” हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे जो अब्बास दलाल आणि हुसैन दलाल यांनी लिहिलेला आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहेत. हा चित्रपट आहेव्हाईट फेदर फिल्म्सच्या बॅनरखाली संजय गुप्ता आणि अनुराधा गुप्ता यांनी निर्मित केला आहे. तसेच या चित्रपटामध्ये रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्यासोबत प्रिया बापट आणि क्रिस्टल डिसोझा सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. आणि या सगळ्या मोठ्या कलाकारांसह मराठी अभिनेता नचिकेत पूर्णपात्रे देखील झळकला आहे.
मुळात आपल्या कामाच्या निवडी बाबत काटेकोर असल्यामुळे नचिकेत कायमच अत्यंत महत्त्वाच्या आणि आशयघन चित्रपट आणि नाटकांचा भाग असतो. “तू”, “रामप्रहर”, “सिंधू सुधाकर रम आणि इतर” अश्या प्रायोगिक नाटकांच्या सोबत “दिल दोस्ती दुनियादारी”, “पिंजरा”, “लक्ष्मणरेषा” या सारख्या मालिकांच्या आणि “अस्तू”, “मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर” इत्यादी कलात्मक चित्रपटांच्या बरोबरीनेच मुख्य प्रवाहातील “फोर्स 2”, “रॉकी हँडसम”, “दगडी चाळ – 2” अश्या अनेक दर्जेदार कलाकृींमध्ये अभिनेत्याने या पूर्वी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
हे देखील वाचा- ‘थोडी तरी दया दाखवा’, विजय वर्माने मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येप्रकरणी मीडियावर व्यक्त केला संताप!
आता पुन्हा एकदा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम कलाकृतींच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर येत आहे. नचिकेत भविष्यात अनेक उत्तम प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे यात शंका नाही.