(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘पुष्पा 2’ हा या वर्षातील सुपरहिट चित्रपट असणार आहे. ज्याची प्रेक्षक अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटाची अनेक महिन्यापासून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा देखील सुरु आहे. ‘किसिक’ या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याने रिलीज झाल्यानंतर इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली. तसेच हा चित्रपट रिलीज होण्याआधीच विक्रम मोडत इतिहास रचत आहे. आता या चित्रपटाने रिलीजच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘पुष्पा 2’ च्या ॲडव्हान्स बुकिंगसाठी तिकीट खिडक्या उघडल्या आहेत.
‘पुष्पा 2’ चा ॲडव्हान्स बुकिंगसह तडका
या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग देशभरात ३० नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. पण दरम्यान या चित्रपटाने एका राज्यात सर्वात मोठा विक्रम केला आहे. पुष्पा 2 ची ॲडव्हान्स बुकिंग प्रथम दिल्ली, गुजरात, केरळ आणि पंजाबमध्ये उघडण्यात आली होती. या चार राज्यांपैकी केरळमध्ये सर्वाधिक विक्री सुरू झाली आहे. आणि या चित्रपटाने रिलीजआधीच चांगलीच कमाई केली आहे.
केरळमध्ये ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर, प्री-सेल्समध्ये सुमारे 60% वाढ झाली आहे. तर दिल्लीत ३० टक्के वाटा दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी काळात पुष्पा 2 ची प्री-सेल्स आणखी वाढणार आहे. आणि या बातमीने चित्रपटाच्या निर्मात्यांना आणखी आनंद झाला आहे. चित्रपट रिळंज होण्याआधीच यशस्वी होण्याच्या टप्प्यात आहे.
तिकीट कुठे आणि कसे बुक करावे हे माहित आहे?
जर तुम्ही पुष्पा 2 पाहण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आवडीचे तिकीट आणि थिएटर निवडून बुक माय शो या अँप मधून तिकिटे खरेदी करू शकता. बुक माय शोच्या तिकिटाच्या बाबतीत कोणत्याही दर्शकाला समस्या येत असल्यास, आपण पेटीएम देखील वापरू शकतो. BookMyShow वरील प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता 1 मिलियनच्या जवळपास आहे.
फरहान अख्तरने ‘डॉन 3’ ला नाही तर या चित्रपटाला दिले प्राधान्य, मलेशियातून बोलावले खास कलाकार!
यावेळी चित्रपटात असेल खास?
हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा: द राइज या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 2021 मध्ये अल्लू अर्जुन ‘पुष्पराज’ म्हणून आला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. आता 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा अभिनेता काहीतरी नवीन करून दाखवेल अशी आशा चाहत्यांना आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे त्यातील ॲक्शन सीन्स अतिशय सुरेखपणे कोरिओग्राफ करण्यात आले आहेत. यात अल्लू अर्जुनने आपल्या करिअरमधील सर्वोत्तम परफॉर्मन्स दिल्याचे सांगण्यात येत आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना चमकणार आहे.