
(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुनने एक अशी कामगिरी केली आहे जी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन आणि अक्षय कुमार सारखे बॉलिवूड सुपरस्टार देखील करू शकले नाहीत. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलने रिलीजपूर्वीच 920 कोटींची कमाई केली आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित अनेक आकडे मांडले जात आहेत. 920 कोटी रुपयांच्या या कलेक्शनमध्ये थिएटर राइट्सपासून ते OTT राइट्सपर्यंतच्या आकडेवारीचा समावेश आहे.
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 च्या चित्रपगृहातील राइट्सबाबत सांगितले जात आहे की हे 650 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. इन्स्टाग्रामवर असा दावाही करण्यात आला आहे की, एखाद्या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच इतका व्यवसाय करणे हा भारतीय सिनेमासाठी एक नवीन विक्रम आहे. याआधी चित्रपटाच्या ओटीटी राइट्सशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे राइट्स 270 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
हे देखील वाचा- Do Patti Trailer: शाहीर शेखसाठी दोन जुळ्या बहिणी झाल्या वेड्या, काजोल-क्रिती सेनॉनचा ‘दो पत्ती’ सस्पेन्सने भरलेला!
मात्र, थिएटर राइट्स आणि ओटीटी राइट्सच्या किमती अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पण असे मानले जाते की चित्रपट ओटीटी राइट्सच्या बाबतीत, एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाचा विक्रम मोडला गेला आहे. या चित्रपटाच्या ओटीटी डीलचा रेकॉर्ड 170 कोटी रुपयांचा आहे. पण 250 ते 300 कोटींच्या दरम्यान विकल्या गेलेल्या पुष्पा 2 ने RRR चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘पुष्पा 2’ चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना दिसणार आहेत. चित्रपटाचे बजेट जवळपास 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.