Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घरात ठेवले आहेत बॉम्ब…’, साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुषला जीवे मारण्याची धमकी? पोलिसांचा तपास सुरु

दक्षिण भारतातील दोन प्रसिद्ध स्टार्सना त्यांच्या घरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी ई मेलवर मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे, परंतु त्यांच्या तपासात कोणताही निकाल लागलेला नाही.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 29, 2025 | 03:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • रजनीकांत आणि धनुषला मिळाली धमकी
  • धमकी खोटी असल्याचे झाले निष्पन्न ?
  • रजनीकांत आणि धनुषच्या घराची झडती

बॉलीवूड स्टार्स आणि युट्यूबर्सना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या यादीत सलमान खानपासून शाहरुख खानपर्यंतच्या नावाचा समावेश आहे. परंतु , या धमक्या अनेकदा खोट्या ठरल्या आहेत. दरम्यान, दक्षिण भारतातील दोन प्रमुख स्टार्सना धमकीचे ईमेल आले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. आणि हे कलाकार दुसरे तिसरे कोण नसून साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष हे दोघे आहेत.

“मी कायदेशीर कारवाई करेन…”, अखेर माही विजने पती जय भानुशाली सोबतच्या घटस्फोटांच्या बातम्यांवर सोडले मौन

रजनीकांत आणि धनुष यांना मिळावी धमकी
दक्षिण सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांना बॉम्बस्फोटाच्या धमक्याचे ईमेल मिळाले आले. पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. हे ईमेल तामिळनाडूच्या पोलिस महासंचालकांच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर पाठवण्यात आले. ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की दोन्ही अभिनेत्यांच्या चेन्नईतील घरांवर बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, अधिकाऱ्यांनी ताबडतोब शोध मोहीम सुरू केली, परंतु पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर, धमक्या खोट्या असल्याचे आढळून आले.

ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले
एवढेच नाही तर या ईमेलमध्ये तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे प्रमुख के. सेल्वापेरुंथागाई यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. परिणामी, तिघांच्या घरांची झडती घेण्यात आली आणि धमक्या खोट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या चौकशीनंतर, पोलिसांनी जनतेला माहिती दिली की कोणतेही बॉम्ब किंवा तत्सम वस्तू सापडल्या नाहीत, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

‘मुंबई पुणे मुंबई 4’ ची घोषणा; 15 वर्षांनंतर प्रेक्षकांना पुन्हा भेटणार गौरी–गौतम

यापूर्वी अनेक घटना आल्या समोर
हे लक्षात घेण्यासारखे आहे की तामिळनाडूमध्ये अशा घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही; याआधीही अशाच घटना घडल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, अभिनेत्री त्रिशा आणि इतर व्हीआयपींच्या मालमत्तेला लक्ष्य करून बॉम्बची बनावट धमकी पाठवण्यात आली होती. शिवाय, ९ ऑक्टोबर रोजी, अभिनेता विजयच्या नीलंकराई येथील घरी बॉम्बची बनावट धमकी पाठवल्याबद्दल शाबिक नावाच्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Rajinikanth dhanush receive bomb threat emails chennai police declare them fake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Dhanush
  • Rajinikanth
  • tollywood movie

संबंधित बातम्या

आदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या ‘डकैत: एक प्रेम कथा’ ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
1

आदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या ‘डकैत: एक प्रेम कथा’ ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

‘Chhaava’ चा लवकरच तुटणार रेकॉर्ड, ‘Kantara Chapter 1’ चा धुमाकूळ; रविवारी एवढ्या कोटींचे कलेक्शन
2

‘Chhaava’ चा लवकरच तुटणार रेकॉर्ड, ‘Kantara Chapter 1’ चा धुमाकूळ; रविवारी एवढ्या कोटींचे कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.