
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या अतरंगी अंदाज आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच एका इव्हेंटदरम्यान तिने‘बिग बॉस 19’ची स्पर्धक तान्या मित्तल हिच्यावर निशाणा साधला आहे.
ज्वेलरच्या दुकानात पोहोचलेल्या राखी सावंत हिने मीडियासमोर तान्या मित्तलच्या मोठ्या मोठ्या डायलॉग मारण्याच्या सवयीवर टोला लगावला. राखी स्वतः सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली दिसली आणि त्यावेळी ती म्हणाली, “मी फेकू नाहीये, श्रीमंती काय असते ते माझ्यात पाहा…” पुढे ती म्हणाली, “सलमान भाई, मी येतेय ‘बिग बॉस’मध्ये… आणि मी तान्या मित्तलला दाखवणार आहे!”
राखी सावंतने तान्या मित्तलवर केलेल्या टोमण्यांमुळे ‘बिग बॉस’चे चाहते आता अंदाज लावत आहेत की, ही ड्रामा क्वीन शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार का? मीडियाने जेव्हा राखीला विचारले की ती ‘बिग बॉस 19’मध्ये जाणार आहे का, तेव्हा राखीने नेहमीप्रमाणे सस्पेन्स कायम ठेवत उत्तर दिले आणि चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली.
राखी सावंत अनेक वेळा ‘बिग बॉस’चा भाग राहिली आहे आणि प्रत्येक वेळी तिच्या उपस्थितीमुळे शोच्या टीआरपीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. तिचं हा नवीन ड्रामा आणि तान्या मित्तलसोबतचं भांडण यामुळे तिच्या ‘बिग बॉस 19’मध्ये एन्ट्री घेण्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे. चाहते आशा व्यक्त करत आहेत की ‘असली ड्रामा क्वीन’ लवकरच बिग बॉसच्या घरात पुन्हा धमाल उडवणार आहे.
याआधीही राखी सावंतने तान्या मित्तलवर टीका केली होती, तर अलीकडेच तिने अभिनेत्री तमन्ना भाटियावरही राग व्यक्त केला. राखी म्हणाली होती,’तुमच्याकडे इतक्या मोठ्या चित्रपटांची ऑफर आहे आणि तुम्ही हिरोइन आहात, तरी तुम्ही आइटम सॉंग्स का करत आहात?”