(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
१४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात विद्या बालन आणि इमरान हाशमी होते. विद्या बालनने या चित्रपटात १९८० च्या दशकातील सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण, तुम्हाला माहीत आहे का, या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी लीड हीरोइनची पहिली पसंती विद्या बालन नव्हती.
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार एन्ट्री मारली होती. या चित्रपटाची केवळ कथा नाही, तर गाणीही प्रेक्षकांना खूप आवडली आणि ती सुपरहिट ठरली. या चित्रपटात विद्या बालन आणि इमरान हाशमी यांच्यासोबतच नसीरुद्दीन शाह आणि तुषार कपूरही होते. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथारिया यांनी केले होते. या चित्रपटात विद्या बालनच्या अभिनयासोबतच त्यांचा सिजलिंग अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला, ज्यामुळे त्यांना बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली.
प्रेमाला वय नसतं! लैंगिक छळाचे आरोप होऊन देखील ‘या’ गायकाने थाटला दुसरा संसार; थेट 16 वर्षांनी लहान…
विद्या बालनच्या आधी ‘द डर्टी पिक्चर’साठी निर्मात्यांची पहिली पसंती होती कंगना राणौत. या सुपरहिट चित्रपटात काम करण्यासाठी मेकर्सनी कंगनाला ऑफर दिली होती, मात्र कंगनाने ही भूमिका नाकारली. याबद्दल तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की ती या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती होती, पण काही कारणास्तव तिने ही ऑफर स्वीकारली नाही.
कंगना राणौत म्हणाली की, तिला चित्रपटाची पटकथा फारशी आवडली नव्हती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल असा तिला विश्वास नव्हता. मात्र प्रत्यक्षात ‘द डर्टी पिक्चर’ ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आणि सुपरहिट ठरला.या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी विद्या बालनला २०११ मध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
विद्या बालनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झालं तर, विद्या बालन आता रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटात झळकणार असून, तिने या चित्रपटासाठी तयारी सुरू केली आहे.






