
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राखी सावंत केवळ तिच्या बोल्ड स्टाईलसाठीच ओळखली जात नाही तर तिच्या वक्तव्यांमुळेही ती अनेकदा वादात सापडली आहे. तसेच अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. आता अशातच राखीने गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान राखी सावंतने अलीकडेच एक धक्कादायक विधान केले आहे. राखीने सुनीताचे उघडपणे कौतुक केले आहे आणि तिला “राखी सावंत २.०” असे संबोधले आहे. राखी सुनीता आहुजा यांच्याबद्दल नक्की काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.
राखी सावंतने सुनीता आहुजाचे केले कौतुक
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या अलिकडेच दिलेल्या मुलाखतीदरम्यान, “ड्रामा क्वीन” म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतने गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्याबद्दल एक विधान केले आहे. तिने सुनीताच्या बोल्ड व्यक्तिमत्त्वाचे उघडपणे कौतुक केले आहे आणि म्हणाली आहे की, “माझ्यानंतर जर कोणी असेल तर ते सुनीता जी आहेत.”
“सुनीता राखी सावंत २.० आहे” – राखी
या मुलाखतीदरम्यान, राखी सावंतला विचारण्यात आले की, बॉलीवूडमध्ये तिची जागा कोण घेऊ शकते. उत्तरात, राखीने निःसंकोचपणे गोविंदाची पत्नी सुनीता यांचे नाव घेतले. राखी सावंत म्हणाली की, माझ्यानंतर जर कोणी असेल तर ती सुनीता जी आहे. सुनीता जी बोल्ड आहेत, अगदी माझ्यासारखीच. अगदी राखी सावंत २.०. मला ती खूप आवडते ती एकमेव व्यक्त आहे जी मला रिप्लेस करू शकते.’ असे राखी सांगताना दिसली आहे.
“ती मला खरी वाटते.” – राखी सावंत
राखी सावंत सुनीताचे कौतुक करून एवढ्यावरच थांबली नाही. ती पुढे म्हणाली, “हो, मी गोविंदाजींच्या पत्नीला शांत आणि धाडसी पद्धतीने बोलताना पाहिले आहे. प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे. मी सुनीताजींना सलाम करते. ती जे योग्य वाटते ते बोलते. मला ती खरी वाटते. २४ कॅरेटच्या सोन्यासारखीच सुनीताजी सोन्यासारखी आहे.” असे राखी म्हणताना दिसली आहे.
“चिची भैय्या यांनी खूप संघर्ष केला” – राखी
राखीने गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाच्या बातमीवरही प्रतिक्रिया दिली. राखी सावंत म्हणाली, “मी चिची भैय्याला अनेक वेळा भेटली आहे. माझ्या संघर्षाच्या काळात मी त्याच्यासोबत अनेक गाण्यांवर काम केले आहे. विशेष म्हणजे त्याने कधीही माझ्याकडे पाहिले नाही.” परंतु, मी संपूर्ण बॉलीवूडची सोनपापडी आहे. चिची भैय्या यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.’ असे ती म्हणताना दिसली आहे.