(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
६ नोव्हेंबर रोजी बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली. सुलक्षणा पंडित या बॉलीवूडमधील अशा सुंदरींपैकी एक होत्या ज्यांनी त्यांच्या अभिनय आणि गायनाने चाहत्यांची मने जिंकली. आता, सुलक्षणा पंडित यांची बहीण विजयता पंडितने यांनी त्यांच्या बहिणीचे शेवटचे क्षण कसे होते याबद्दल आपले मन मोकळले केले आहे. विजयता म्हणाल्या की, सुलक्षणा पंडितचे शेवटचे क्षण खूप वेदनादायक होते. ती १६ वर्षे अंथरुणाला खिळून होती. विजयता पंडितने आणखी खुलासे केले हे आपण जाणून घेणार आहोत.
विजयता काय म्हणाली?
सुलक्षणा पंडित यांची बहीण विजयता पंडित यांनी अलीकडेच ईटाइम्सला दिलेल्या मुलाखत म्हणाले आहे की, “सुलक्षणा दीदी माझ्यासाठी आईसारखी होती. तिच्या कंबरेला दुखापत झाली होती, त्यानंतर तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु, गेल्या १६ वर्षांपासून ती अंथरुणाला खिळून होती. या वेदनादायक काळात मी आणि माझ्या कुटुंबाने तिची चांगली काळजी घेतली.” आम्ही कुटुंबातील एक सदस्य तसेच एक प्रतिभावान गायिका आणि अभिनेत्री गमावली आहे.’ असे विजयता पंडित या म्हणल्या. बहीणीच्या आठवणीत त्या पुन्हा भावुक झाल्या.
सुलक्षणाचे नाव संजीव कुमारशी जोडले गेले
सुलक्षणा पंडित यांनी अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले होते. अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबतच्या अभिनेत्रीच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. वृत्तानुसार, जेव्हा संजीव कुमार यांनी अभिनेत्रीला प्रपोज केले तेव्हा तिने त्यांचा प्रपोज नाकारला. त्यानंतर सुलक्षणाने कधीही लग्न केले नाही. सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले तो दिवस संजीव कुमार यांचा पुण्यतिथी दिवस होता.
Haq BO Collection: दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘हक’चा धुमाकूळ, चित्रपटाने केली एवढी कमाई
विजयता यांनी संजीव कुमार यांच्याबद्दलही सांगितले
विजयता यांनी मुलाखतीत सुलक्षणा आणि संजीव कुमार यांच्याबद्दलही चर्चा केली. विजयता यांनी स्पष्ट केले की, ‘संजीव कुमार यांचे तिच्या कुटुंबाशी असलेले नाते खूप खास होते. परंतु, यांच्या नात्याचे रूपांतर कधीही लग्नापर्यंत झाले नाही. लग्न न केल्यानंतर, दोघेही आयुष्यभर अविवाहित राहिले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संजीव कुमार यांनी जग सोडले त्याच दिवशी सुलक्षणा दीदींचे निधन झाले.’ असे त्या म्हणाल्या. तसेच हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुलक्षणा पंडित यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.






