Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Game Changer Trailer: राम चरण-कियाराचा ‘गेम चेंजर’चा ट्रेलर यादिवशी होणार प्रदर्शित; निर्मात्यांनी चाहत्यांना दिले अपडेट!

राम चरण आणि कियारा अडवाणी यांच्या बहुप्रतिक्षित पॉलिटिकल ड्रामा फिल्म गेम चेंजरचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. जाणून घ्या गेम चेंजर चित्रपटाचा ट्रेलर कधी आणि कोणत्या दिवशी रिलीज होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 30, 2024 | 02:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गेम चेंजर हा चित्रपट बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील राम चरण आणि कियारा अडवाणीचा लूकही प्रेक्षकांना आवडला आहे. मात्र चित्रपटाच्या ट्रेलरबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. गेम चेंजर चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी गेम चेंजर चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती शेअर केली आहे की गेम चेंजर चित्रपटाचा ट्रेलर कधी आणि कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर पाहता येणार आहे.

पॅन इंडियाचा स्टार राम चरण गेम चेंजर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रामच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान दिल राजू हे म्हणाले की, “ट्रेलर तयार आहे, पण तुमच्यासमोर रिलीज करण्यापूर्वी अजून काही काम बाकी आहे. ट्रेलर चित्रपटाची रेंज ठरवतो. आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही तो अनुभव घ्या. हा ट्रेलर 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल.” असे त्यांनी सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल राजू म्हणाले की, “अमेरिकेत यशस्वी कार्यक्रम आयोजित केल्यानंतर, आम्हाला तेलुगू राज्यांमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करायचा होता, ज्यामध्ये आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण गरू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.” तसेच ते फुडें म्हणाले की, राम चरणच्या चित्रपटात ही घटना इतिहास घडवू शकते. तसेच, या चित्रपटाची प्रतीक्षा अनेक काळापासून चाहते करत आहेत. याचदरम्यान आता निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज डेट जाहीर केली असून, यामुळे चाहते देखील आनंदी झाले आहेत.

Dahavi-A: ‘आठवी अ’च्या यशानंतर ‘दहावी अ’चा सिरीजचा ट्रेलर; ‘इट्स मज्जा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं करणार मनोरंजन!

गेम चेंजर हा दिग्गज चित्रपट निर्माता एस शंकर दिग्दर्शित आगामी राजकीय ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपटाची कथा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली असून या चित्रपटात कियारा अडवाणीसह राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा राम चरण या IAS अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेवर केंद्रित आहे जो भ्रष्ट राजकीय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी लढतो. टीझरमध्ये, तो त्याच्या अनेक लूकमध्ये दिसत आहे, जे त्याच्या दुहेरी भूमिकेकडे निर्देश करते. गेम चेंजर हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

राम चरण आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त चित्रपटात एसजे सूर्या, अंजली, समुथिराकणी, श्रीकांत आणि जयराम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राम चरण RC16 नावाच्या आणखी एका चित्रपटात काम करत आहेत. याचे दिग्दर्शन बुची बाबू सना करत आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूर अभिनेत्यासह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर शिवा राजकुमार सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस आहे.

Web Title: Ram charan kiara advani game changer trailer release on this date producer dil raju major updates report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • KIARA ADVANI
  • Ram Charan

संबंधित बातम्या

लग्नाच्या दोन वर्षांनंतर वरुण तेज आणि लावण्या झाले आई- बाबा; कोनिडेला कुटुंबात गोंडस बाळाचा जन्म
1

लग्नाच्या दोन वर्षांनंतर वरुण तेज आणि लावण्या झाले आई- बाबा; कोनिडेला कुटुंबात गोंडस बाळाचा जन्म

मातृत्वाचे जीवन आनंदाने जगतेय कियारा अडवाणी; मध्यरात्री गोंडस बाळासाठी शेअर केली ‘ही’ पोस्ट
2

मातृत्वाचे जीवन आनंदाने जगतेय कियारा अडवाणी; मध्यरात्री गोंडस बाळासाठी शेअर केली ‘ही’ पोस्ट

वयाच्या सत्तरीत हृतिकच्या आईने ‘War २’ च्या गाण्यावर केला डान्स, Viral Video ने केले चाहत्यांना चकीत
3

वयाच्या सत्तरीत हृतिकच्या आईने ‘War २’ च्या गाण्यावर केला डान्स, Viral Video ने केले चाहत्यांना चकीत

‘War 2’ चं पहिलं गाणं ‘आवा जावा’ प्रदर्शित! हृतिक-कियाराचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चर्चेत
4

‘War 2’ चं पहिलं गाणं ‘आवा जावा’ प्रदर्शित! हृतिक-कियाराचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.