(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर पुन्हा अडचणीत सापडला आहे. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेली वेब सिरीज ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. पहिल्याच प्रोजेक्टमध्ये आर्यनने मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे, प्रेक्षकही त्याचं कौतुक करत आहेत. मात्र आता ही सिरीज विवादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने या सिरीजमधील एका दृश्यावर आक्षेप नोंदवला आहे. या सीनमध्ये रणबीर कपूरहे ई-सिगारेट ओढताना दिसत आहे, आणि विशेष बाब म्हणजे, या दृश्यात कुठलीही चेतावणी संदेश किंवा आरोग्यविषयक सूचनाही दिली गेलेली नाही.
RANBIR KAPOOR DIRECTED BY ARYAN KHAN 😭🔥
pic.twitter.com/mykXxiD36z — sanil (@ohbaazigar) September 18, 2025
मानवाधिकार आयोगाने यावर स्पष्ट शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार,“सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची दृश्यं नवीन पिढीवर वाईट परिणाम करू शकतात.सिगारेट किंवा धूम्रपान संबंधित कोणतीही दृश्य दाखवताना आरोग्याशी संबंधित संदेश देणं अत्यावश्यक आहे.”
90 च्या दशकातलं बॉबी देओलचं ‘हे’ गाणं तब्बल २८ वर्षांनंतर अजूनही होतय हीट
‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ ही आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पहिलीच सिरीज आहे. यात बॉबी देओल, मोना सिंग, रणबीर कपूर, तसेच लक्ष्य, सहर बाम्बा, राघव जुयाल आणि अनन्या सिंह यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.ही सिरीज शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट ने प्रोड्यूस केली आहे.
NHRC seeks Action Taken Report from I&B Ministry & Mumbai Police over Netflix’s ‘Ba*ds of Bollywood’. Ranbir Kapoor shown using a banned e-cigarette without warnings, complaint says it misleads youth. #BadsOfBollywoodReview #ranbirkapoor #nhrc #netflix pic.twitter.com/3Ej7xWdTfI — Amit Shukla (@amitshukla29) September 22, 2025
मुक्ता बर्वे म्हणते, ‘‘साबर बोंडं पाहिल्यावर अभिमानाने मन भरून येतं”
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियंक कानूनगोयांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.“आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस जारी केली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की त्यांनी संबंधित अभिनेत्या, निर्मात्या कंपनी आणि OTT प्लॅटफॉर्मविरुद्ध त्वरित FIR नोंदवून कायदेशीर कारवाई करावी.”