(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
90 च्या दशकातील सुपरहिट हिंदी चित्रपट ‘गुप्त द हिडन ट्रुथ’ मधील एक अजरामर गाणं म्हणजे ‘दुनिया हसीनों का मेला’. उदित नारायण यांच्या आवाजातले हे गाणं आजही तितकंच ताजं वाटतं. आज, तब्बल २८ वर्षांनंतर, हे गाणं पुन्हा एकदा लोकांच्या ओठांवर आलं आहे आणि त्यामागचं कारण आहे शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याची पहिली वेब सिरीज – ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ही सिरीज आर्यन खानने दिग्दर्शित केली असून यात बॉबी देओल यांनी अजय तलवार नावाच्या भूमिकेत दमदार अभिनय केला आहे.
या गाण्याचा वापर सिरीजमध्ये अशा पद्धतीने करण्यात आला आहे, की ते प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा राज्य करत आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे अनेक व्हिडीओ, रील्स आणि ट्रेंड व्हायरल होत आहेत. ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ ही सिरीज केवळ स्टारकिड्सवर आधारित नसून, बॉलिवूडच्या चकचकीत जगातला गडद वास्तव उलगडण्याचा प्रयत्न करते. बॉबी देओलचा प्रभावशाली अभिनय, आर्यन खानचं दिग्दर्शन आणि 90 च्या दशकातील हिट गाण्याचा आधुनिक वापर,या सगळ्यामुळे ही सिरीज चर्चेत आहे.
मुक्ता बर्वे म्हणते, ‘‘साबर बोंडं पाहिल्यावर अभिमानाने मन भरून येतं”
हे गाणं येवढ्या वर्षांनी का व्हायरल होत आहे?
‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ सिरीजमध्ये अजय तलवार (बॉबी देओल) ही प्रभावशाली व्यक्ती असून, त्याची मुलगी करिश्मा तलवार आणि अभिनेता आसमान सिंह यांच्यात प्रेमसंबंध दाखवले गेले आहेत. सगळं सुरळीत चाललेलं असतानाच, क्लायमॅक्समध्ये प्रेक्षकांना धक्का देणारा ट्विस्ट समोर येतो. मूळ गाण्यात, रीटाला एडिटिंगद्वारे बॉबीसोबत नाचताना दाखवले आहे. व्हिडिओ दरम्यान, अजय आणि रीटाचे त्यावेळी प्रेमसंबंध होते आणि आसमान सिंगचे वडील प्रत्यक्षात अजय तलवार आहेत हे उघड झाले आहे.
‘दुनिया हसीनों का मेला’ या गाण्यामुळे अभिनेता बॉबी देओल त्या काळात एकदम चर्चेत आला होता. या गाण्यामुळे बॉबी देओलचा स्टायलिश अंदाज आणि दमदार डान्स मूव्हज नेहमीच चर्चेत राहिले. असं सांगतात की या गाण्यासाठी बॉबी देओलने तब्बल 9 वेगवेगळ्या जीन्स परिधान केल्या होत्या, ज्यामुळे त्याचा लूक आणि स्टाईल आणखी खास बनला.गेल्या काही वर्षांमध्ये या गाण्याची रिमिक्स व्हर्जन्स, इंस्टाग्राम रील्स आणि डान्स कोरिओग्राफींच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या पिढीत लोकप्रियता मिळवली आहे.