(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘गली का कुट्टा’, ‘रिंग रिंग’ आणि ‘जमैका टू इंडिया’ सारख्या रॅप गाण्यांनी प्रसिद्धी मिळवणारा प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई उर्फ मुहम्मद बिलाल शेख अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याला मोबाईल फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आता धमकी देणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला आसाममधून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अरुलव रमेश कुमार अलोही आहे, ज्याचे वय १८ वर्षे असल्याचे सांगितले जाते. अरुलव रमेश कुमार हा वाणिज्य शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे.
१ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, आसामचा रहिवासी अरुलव रमेश कुमार अलोही याने रॅपर एमीवे बंटाईच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर त्याने रॅपरकडून १ कोटी रुपयांची मागणी केली होती. गेल्या महिन्यात २७ मे रोजी नवी मुंबईतील पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. आता पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आहे.
आठ वर्षांनी वेगळे होणार ‘हे’ हॉलीवूडचे प्रसिद्ध कपल? जोडप्याचं कारण ऐकून व्हाल चकित!
पोलिसांनी संयुक्त कारवाई केली
डिजिटल ट्रॅकिंगच्या आधारे, नवी मुंबईने संयुक्त कारवाई करत आसाममधून आरोपीला अटक केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आसाममधील अरुलव रमेश कुमार अलोही याने रॅपर एमीवे बंटाई यांना १ कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा संदेश पाठवला होता. त्याने गँगस्टर गोल्ड ब्रारशी संबंध असल्याच्या बहाण्याने हे कृत्य केले. असे सांगितले आहे.
रॅपरला धमकी का देण्यात आली?
खरं तर, रॅपर एमीवे बंटाई यांनी दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘ट्रिब्युट टू सिद्धू मूसेवाला’ हे गाणे रिलीज केले. गाणे रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रॅपरला जीवे मारण्याची धमकीचा देण्यात आली. अटक केलेल्या आरोपीला सोशल मीडियावरील कोणीतरी हा संदेश पाठवण्यास प्रेरित केले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीच्या मोबाईलवरूनही हे संदेश डिलीट करण्यात आले आहेत. सध्या पुढील पोलिसांचा तपास सुरू आहे.