(फोटो सौजन्य - Instagram)
५७ वर्षीय अरबाज खान पुन्हा एकदा वडील होणार आहे. दोन वर्षांपूर्वी या अभिनेत्याने शूराशी दुसरे लग्न केले होते. अलिकडेच अरबाजची पत्नी शूरा बेबी बंपसह दिसली होती. आता अरबाज देखील त्याची पत्नी शूरासोबत पापाराझींना दिसला आहे. दोघांनीही पापाराझींसाठी खूप पोज दिल्या. यादरम्यान, अरबाज अचानक पपापाराझींना शूराचा क्युट बेबी बंप लपवताना दिसला आहे. आणि त्याने गंमतीने पापाराझींना एक संदेश दिला. आता अभिनेता नक्की त्यांना काय म्हणाला जाणून घेऊयात.
जयदीप अहलावत झाला मुंबईकर, मायानगरीत खरेदी केलं कोट्यवधींचं घर; किंमत वाचून डोळे फिरतील
पापाराझींना समजून घेण्याची विनंती केली
अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अरबाज खान त्याची पत्नी शूरासोबत दिसत होता. दोघांनीही पापाराझींना फोटो दिले. अचानक पापाराझी म्हणाले, ‘मॅडम, कृपया फोटो समोर बघून द्या.’ यावर अरबाज म्हणाला, ‘कृपया तुम्ही समजून घ्या आता जाऊद्यात ?’ शूरा एका अँगलने पोज देताना दिसली आहे जर तिने वेगळ्या अँगलने फोटो दिला असता तर तिचा बेबी बंप दिसला असता. अरबाजला कदाचित हे घडायला नको होते. याशिवाय, शूरानेही सैल ड्रेस घातला होता, ज्यामुळे तिचा बेबी बंप दिसत नव्हता. तर काही दिवसांपूर्वी ती टाईट ड्रेसमध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत होता.
कीर्तनाच्या माध्यमातून ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे करणार पर्यावरणाचा जागर
आधी मलायका अरोरा सोबत घटस्फोट नंतर शूरा सोबत लग्न
अभिनेता अरबाजचे शूरा सोबत लग्न हे त्याचे दुसरे लग्न आहे. दोघांनीही २०२३ मध्ये लग्न केले. आता अरबाज वडील होणार आहे. अरबाजची एक्स पत्नी मलायका अरोरा आहे. मलायका आणि अरबाजला एक मुलगा देखील आहे. १९ वर्षांच्या लग्नानंतर दोघांचा घटस्फोट झाला. २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आणि अरबाजने दुसरे लग्न केले.
अरबाज आणि शूराची भेट कशी झाली
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूरा एक व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे. ती ‘पटना शुक्ला’ चित्रपटात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती, त्याच दरम्यान तिची अरबाजशी ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली, नंतर प्रेम झाले. नंतर शूरा आणि अरबाजने लग्न केले.