(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या नव्या लक्झरी घराच्या सजावटीत व्यस्त आहे. पण या आलिशान घरात फक्त त्यांचं कुटुंबच नाही, तर एका खास व्यक्तीसाठी स्वतःचा एक खास रूम ठेवण्यात आला आहे. आलिया-रणबीरचं हे बहुप्रतीक्षित घर अखेर तयार झालं आहे आणि हे दोघं लवकरच त्यांच्या या नवीन ‘ड्रीम होम’मध्ये शिफ्ट होणार आहेत.
एकीकडे चित्रपटांचं शेड्यूल, प्रमोशन्स आणि इतर जबाबदाऱ्या हाताळताना, आलिया आणि रणबीर या दोघांनीही घराच्या प्रत्येक तपशीलाकडे स्वतः लक्ष दिलं आहे, घराच्या प्रत्येक गोष्टीकडे या दोघांनी जाऊन लक्ष घातल्या व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बघितले आहेत. या आलिशान बंगल्याची किंमत जवळपास २५० कोटी रुपये असून तो दिवंगत राज कपूर यांच्या ‘कृष्णा बंगलो’च्या जागेवर उभारण्यात आला आहे, म्हणजेच कपूर कुटुंबाच्या इतिहासाशी जोडलेलं हे घर आता एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे.
Elizabeth Ekadashi:- एलिझाबेथ एकादशी’तील बालकलाकाराची नवी वाटचाल !
फराह खानच्या ब्लॉगमधील गप्पांदरम्यान, रिद्धिमाकडून ही माहिती समोर आली आहे. फराहने थेट विचारलं,”मुंबईत जे तुमचं नवीन घर बनत आहे, त्यात तुमच्यासाठी स्वतंत्र फ्लोर आहे का?” त्यावर रिद्धिमा कपूर हसत हसत उत्तर देते,”आईच्या फ्लोरवर माझ्यासाठी आणि माझ्या पती भरतसाठी एक रूम आहे. तसंच माझी मुलगी समायरा साठीही. माझी आई आम्हाला आपल्या जवळच ठेवू इच्छिते.”
कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल, म्हणाला; ”रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण…”
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या या नवीन ‘ड्रीम होम’वर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर या घराबाबत उत्साह व्यक करत लिहिलं आहे, “हे केवळ बंगलं नाही, तर कपूर कुटुंबाच्या परंपरेचं जिवंत रूप आहे!”