लोकप्रिय बालकलाकार श्रीरंग महाजनचा प्रवास – सिनेमापासून थेट संगणक अभियांत्रिकीपर्यंत
Summery
श्रीरंग महाजन स्वतः सांगतो, “एलिझाबेथ एकादशी सिनेमामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. लोक आजही त्याच चित्रपटामुळे त्याला ओळखतात. आजही त्याला संदेश पाठवतात. लहानपणी प्रसिद्धीबद्दल फारसे कळत नव्हते पण त्याची मजा अजूनही घेत आहे. पण पोटापाण्यासाठी अभिनय हे माझं साधन नाही हे मी जाणलं होत. सो मी माझ्या करियरसाठी दुसरा मार्ग शोधला होता. विज्ञान शाखेत शिक्षण सुरू केलं त्या नंतर त्याने अभियांत्रिकी संगणक शाखेत पदवी प्राप्त केली. पुण्यात आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केल आणि आता एका नामांकित कंपनीत नोकरी करत आहे. तो हे हि सांगतो कि मला घरच्यांनी कधीच दडपण दिल नाही कि तू अभिनय सोडून नोकरी करावी. मला स्वतःलाच वाटत होत कि आपण नोकरी करून आयुष्य सेटल करावं.
एलिझाबेथ एकादशी खरंतर माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होत तो अनुभव मी अजूनही घेत आहेत. त्या साठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण मला अभिनयात स्वतःला झोकून द्यायचे नव्हते म्हणून मी दुसरा मार्ग निवडला. आज श्रीरंग महाजन अभिनयापासून दूर असला, तरी प्रेक्षकांच्या मनात त्याची ‘एलिझाबेथ एकादशी’ मधील भूमिका कायमस्वरूपी कोरली गेली आहे. बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास आता संगणक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात पुढे सरकत आहे.






