(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ऋषभ शेट्टीच्या या वर्षातील सर्वात चर्चेत असलेला चित्रपट “कांतारा चॅप्टर १” चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी चाहते आधीच उत्सुक होते आणि ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. आता, ट्रेलर प्रदर्शित होताच तो व्हायरल झाला आहे आणि सोशल मीडियावर ट्रेंड झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर, चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. जबरदस्त ट्रेलरने चाहत्यांना थक्क केलं आहे.
हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केला आहे.
ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला “कांतारा: चॅप्टर १” हा होम्बाले फिल्म्सच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. संगीत दिग्दर्शक बी. अजनीश लोकनाथ, सिनेमॅटोग्राफर अरविंद कश्यप आणि प्रोडक्शन डिझायनर विनेश बांगलन यांच्यासह क्रिएटिव्ह टीमने एकत्रितपणे चित्रपटाच्या शक्तिशाली दृश्यांना आणि भावनिक कथेला आकार दिला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपट पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये झळकणार ‘हा’ TV अभिनेता, वर्षानुवर्षांच स्वप्न झालं पूर्ण
ट्रेलरमध्ये जबरदस्त दृश्ये दिसले
२ मिनिटे ५६ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये ऋषभ शेट्टी आणि गुलशन देवैया यांच्यातील एक भयंकर युद्ध दाखवले आहे. गुलशन चित्रपटात एक राजा म्हणून खलनायकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात राजा आणि त्याच्या प्रजेतील लढाई दाखवली आहे. ट्रेलरमध्ये दंतकथा आणि लोककथांचा उल्लेख आहे, जो चित्रपटाचा गाभा आहे. ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की चित्रपटात प्रभावी व्हीएफएक्स आणि दृश्ये असणार आहेत, कारण ट्रेलरमधील काही दृश्ये तुम्हाला नक्कीच “वाह!” म्हणायला लावतील.
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये झळकणार ‘हा’ TV अभिनेता, वर्षानुवर्षांच स्वप्न झालं पूर्ण
ऋतिक रोशनने हिंदी ट्रेलर लाँच केला
चित्रपटाचा ट्रेलर वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या सुपरस्टार्सनी सादर केला आहे. हिंदी ट्रेलर लाँच बॉलीवूड स्टार हृतिक रोशनने केला, तर तेलुगू ट्रेलर प्रभासने, तमिळ ट्रेलर शिवकार्तिकेयनने आणि मल्याळम ट्रेलर पृथ्वीराज सुकुमारनने लाँच केला आहे. चित्रपटाभोवती प्रचंड उत्साह आहे. तसेच ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.