(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी देवीचं दर्शन घेत आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे. तसेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता कपिल होनराव. ज्याला प्रेक्षकांचं भरभरून मिळालं. त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याची वर्णी थेट रितेश देशमुखच्या सिनेमात लागली आहे. अभिनेता ‘राजा शिवाजी’ या रितेशच्या आगामी चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याचा नवरात्री मधील पहिलाच दिवस आनंद ठरला आहे आणि त्याने त्याच्या चाहत्यांना देखील खुश केलं आहे. सिनेमाच्या क्लॅपबोर्डसोबतचे फोटो शेअर करत खास नोटही लिहिली.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीचा नवरा म्हणजेच अभिनेता कपिल होनराव ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या तयारीत लागला आहे. कपिल रितेश देशमुखबरोबर स्क्रिन शेअर करणार असून, ही अभिनेत्याची खूप मोठी गोष्ट आहे. कपिलने राजा शिवाजीच्या सेटवर आणि मुंबादेवी मंदिराबाहेरचे फोटो शेअर करत खास नोट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
कपिलने पोस्ट शेअर करत लिहिले की “२०२४ हे वर्ष माझ्यासाठी थोड कठीण वर्ष होत. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आईला मनोभावे प्राथना केली होती की, पुढ्याच्या नवरात्रीपर्यंत काही तरी मोठ होऊ दे. आणि ज्यांना पाहुन मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो #myidol अश्या रितेश विलासराव देशमुख ह्याच्या #राजाशिवाजी ह्या चित्रपटाचा मी भाग झालो. रोहन मापुसकर ह्या मराठी मधला सगळायत मोठ्या कास्टिंग डिरेक्टर ने माझं ह्या सिनेमासाठी कास्टींग केलं.” असे लिहून अभिनेत्याने निर्मात्यांचे आभार मानले आहे.
कपिलने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये महाराजांसोबत बालपणापासून ज्यांनी योगदान दिलं अश्या मावळ्याची भूमिका मला करायला मिळतेय. आज तुमच्या सोबत हे क्लॅप शेअर करतोय.” कपिलने सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत लिहिले, “घटस्थापनेचा हा दिवस आणि आज पासून सुरू होणारी नवरात्र आपल्या जीवनात नवचैतन्य, सुख शांती आणि प्रेमाची वृद्धि करो हीच आमची कामना आपणास नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”,असं कपिलनं म्हटलं आहे. आता कपिलला राजा शिवाजी या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.