Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishi Kapoor Birth Anniversary: नीतू ऋषी कपूरच्या मैत्रिणीसाठी लिहायची टेलीग्राम, अभिनेता कालांतराने पडला नीतूच्या प्रेमात!

बॉलिवूडचे सुपरस्टार ऋषी कपूर यांचे 2020 साली वयाच्या अवघ्या 67 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या ऋषी कपूर यांनी वडील राज कपूर यांच्या मार्गावर चालत बॉलिवूडमध्ये करिअर केले. अनेक चित्रपटामध्ये काम करून आणि चाहत्यांचं मनोरंजन करून प्रेक्षकांना खुश केले. तसेच त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे जाणून घेऊयात अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टी.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 04, 2024 | 12:04 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

ऋषी कपूर यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. ऋषी यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी मुंबईत झाला. ऋषी यांनी मोठ्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्यांची जोडी नीतू कपूरसोबतही पाहायला मिळाली आणि ऋषीने नंतर नीतू कपूरसोबत लग्न केले. ऋषी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला ऋषी आणि नीतूची प्रेमकथा सांगणार आहोत.

नीतू ऋषीला त्याच्या मैत्रिणीला टेलीग्राम लिहिण्यासाठी करत होती मदत
जेव्हा ऋषी कपूर यांनी आपल्या करिअरची सुरुवात मुख्य भूमिकेत केली तेव्हा त्यांची भेट नीतू कपूरशी झाली. मात्र, नीतूवर आपले मन हरवण्यापूर्वी ऋषी कपूर दुसऱ्याच्याच प्रेमात पडले होते. नीतूलाही हे माहीत होतं. नीतू कपूरनेही ऋषींना त्यांच्या मैत्रिणीला टेलीग्राम लिहिण्यात मदत केली होती.

ऋषी कपूर यांनी एका टीव्ही रिॲलिटी शोमध्ये खुलासा केला होता की, ‘मी नीतूला 1974 मध्ये जहरीला इंसान या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेटलो आणि मी पहिल्याच नजरेत नीतूच्या प्रेमात पडलो. त्यादरम्यान, माझा माझ्या मैत्रिणीशी काही मुद्द्यावरून वाद झाला आणि मी खूप दुःखी झालो. यानंतर मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, त्यानंतर नीतूने मला तिच्यासाठी टेलीग्राम लिहिण्यात मदत केली.’ असे अभिनेत्याने सांगितले.

नीतू आणि ऋषी एकमेकांच्या जवळ आले
ऋषी यांनी पुढे सांगितले की त्यांना आणि नीतूला एकमेकांवरील प्रेम कसे झाले. अभिनेत्याने सांगितले होते की, ‘कालांतराने मी माझ्या मैत्रिणीला विसरायला लागलो आणि मला जाणवले की नीतू माझ्यासाठी परिपूर्ण आहे. जहरीला इंसानचे एकत्र शूटिंग पूर्ण केल्यानंतर मी माझ्या इतर प्रोजेक्ट्ससाठी युरोपला गेलो होतो, पण तिथे मला नीतूची उणीव भासत होती. युरोपात राहत असताना मी नीतूला अनेक वेळा टेलिग्राम पाठवले आणि त्यात लिहिले की तुझ्याशिवाय राहू वाटत नाही.’ असे त्याने सांगितले.

हे देखील वाचा- ‘सिकंदर’मध्ये झाली सलमानच्या खास मित्राची एन्ट्री, चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा फोटो आला समोर!

दोघांनी 1980 मध्ये केले लग्न
भारतात परतल्यानंतर ऋषी यांनी नीतूकडे आपले प्रेम व्यक्त केले होते. नीतूही ऋषीचा प्रस्ताव नाकारू शकली नाही. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 1980 मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नानंतर दोघेही एक मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आणि मुलगा रणबीर कपूरचे पालक झाले.

Web Title: Rishi kapoor birth anniversary interesting love story of neetu singh and rishi kapoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Neetu Kapoor

संबंधित बातम्या

खुर्चीवर इंदिरा गांधी अन् जमिनीवर राज कपूर, मनोज कुमार; बॉलिवूडच्या दिग्गजांचा हा दुर्मिळ फोटो चर्चेत
1

खुर्चीवर इंदिरा गांधी अन् जमिनीवर राज कपूर, मनोज कुमार; बॉलिवूडच्या दिग्गजांचा हा दुर्मिळ फोटो चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.