Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टायगर लक्ष्यावर नव्हताच! आधी अमिताभ, आमीर, अक्षयची रेकी; ‘डेड लेटर बॉक्स’ने मुंबईत आले शस्त्र

टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आणि तपासाची दिशा थेट बॉलिवूडच्या तीन दिग्गजांकडे वळली… अमिताभ बच्चन, आमीर खान आणि अक्षय कुमार यांची आधी रेकी करण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा भेदता न आल्याने टायगरला लक्ष्य केल्याचा खुलासा झाला. एवढेच नव्हे, तर हल्ल्यातील पिस्तूल मुंबईत आणण्यासाठी ‘डेड लेटर बॉक्स’ पद्धत वापरल्याचेही समोर आले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 21, 2026 | 12:21 PM
टायगर लक्ष्यावर नव्हताच! आधी अमिताभ, आमीर, अक्षयची रेकी; ‘डेड लेटर बॉक्स’ने मुंबईत आले शस्त्र

टायगर लक्ष्यावर नव्हताच! आधी अमिताभ, आमीर, अक्षयची रेकी; ‘डेड लेटर बॉक्स’ने मुंबईत आले शस्त्र

Follow Us
Follow Us:
  • टायगरआधी तीन बड्या स्टार्सची रेकी
  • ‘डेड लेटर बॉक्स’ने मुंबईत शस्त्र पोहोचले
  • हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक
 

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. टायगर श्रॉफ हा आरोपींचे सुरुवातीचे लक्ष्य नव्हते, असे तपासात समोर आले आहे. त्याआधी आरोपींनी अमिताभ बच्चन, आमीर खान आणि अक्षय कुमार या बॉलिवूडमधील तीन बड्या कलाकारांची रेकी केली होती. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदणे शक्य नसल्याने आरोपींनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला असून, टायगरवरील हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आणि गोळ्या मुंबईत पोहोचवण्यासाठी ‘डेड लेटर बॉक्स’ पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांना आढळले आहे.

अमृतसरमधून शस्त्र मुंबईत

पोलिसांच्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने अमृतसरमध्ये शस्त्र ठेवले होते. अनिल पंडित याने या शस्त्राचे लोकेशन कुणाल आणि सुमित यांना पाठवले. त्यानंतर सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कुणाल आणि सुमित अमृतसरला गेले आणि त्यांनी पिस्तूल ताब्यात घेतले. शस्त्र मुंबईत पोहोचवण्यासाठी आरोपींनी दोन तरुणींची मदत घेतली. राधा आणि बबिता यांना दिल्लीहून मुंबईला रेल्वेने पाठवण्यात आले. यावेळी पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले होते. अशा प्रकारे पोलिसांच्या नजरेत न येता शस्त्र मुंबईत आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News: सहाव्या मजल्यावरून चिमुकल्याला फेकले; सीसीटीव्हीने उघड केला धक्कादायक प्रकार

एन्क्रिप्टेड ॲपवरून संपर्क

कुणाल नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्रामार्फत त्याची अनिल पंडितशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये एन्क्रिप्टेड ॲपवरून संपर्क सुरू होता. अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरमधून एक पिस्तूल आणि २० राऊंड घेतले. यावेळी सुमितही त्याच्यासोबत अमृतसरला गेला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती. त्याने राधाला आपल्या कारवायांची माहिती दिली होती. त्यानंतर तिला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.

१५ ऑक्टोबरला मुंबईकडे रवाना

१५ ऑक्टोबर रोजी कुणाल राधा आणि बबिताला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घेऊन गेला. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले. रेल्वे प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून अनिल पंडितच्या संपर्कात होता आणि त्याच्या सूचनांनुसार पुढील हालचाली करत होता. शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी अनिल पंडितकडून सुमारे ७० ते ८० हजार रुपये देण्यात आल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यातील १० ते १२ हजार रुपये राधा आणि बबिताला देण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

१८ ऑक्टोबरला टायगरवर गोळीबार

१८ ऑक्टोबर रोजी एका पार्कबाहेर टायगर श्रॉफच्या गाडीवर दोघांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात टायगर सुदैवाने बचावला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. टायगरवरील हल्ल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचे नेटवर्क, शस्त्रांचा पुरवठा, हल्ल्याचा कट आणि यामागील सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. या तपासातून बॉलिवूडमधील इतर कलाकारांची रेकी का करण्यात आली होती आणि टायगरला अंतिम लक्ष्य कसे बनवण्यात आले, याचाही उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टायगरआधी कोणत्या कलाकारांची रेकी झाली होती?

    Ans: अमिताभ बच्चन, आमीर खान आणि अक्षय कुमार यांची रेकी झाल्याचे तपासात समोर आले आहे.

  • Que: हल्ल्यातील शस्त्र मुंबईत कसे आणले?

    Ans: अमृतसरमधून पिस्तूल मिळवल्यानंतर ते दिल्लीहून रेल्वेने मुंबईत आणण्यात आले. यासाठी दोन तरुणींची मदत घेतल्याचे समोर आले आहे.

  • Que: टायगरला लक्ष्य का करण्यात आले?

    Ans: इतर बड्या कलाकारांची कडेकोट सुरक्षा भेदणे कठीण असल्याने टायगरला लक्ष्य केल्याचा पोलिसांचा तपास आहे.

Web Title: Tiger shroff firing case bollywood stars reiki weapon supply sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Bollywood News Update
  • Firing News
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?
1

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
2

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा
3

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते, पण पुढे काय घडलं?
4

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते, पण पुढे काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.