(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रतीक गांधी स्टारर स्पाय वेब सिरीज ‘सारे जहाँ से अच्छा’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर सोमवारी नेटफ्लिक्स इंडियाने रिलीज केला. यात भारत आणि पाकिस्तानमधील नाट्य आणि आण्विक संघर्षाची झलक दाखवण्यात आली आहे. तसेच या वेब सिरीजमध्ये जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रतीक गांधी या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
ही कथा भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाची असेल
ट्रेलरमध्ये प्रतीक गांधी यांनी भारताच्या रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. तो भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये तैनात आहे. तो पाकिस्तानमध्ये होत असलेल्या अणु कारवाया थांबवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान त्याला खूप संघर्ष करावा लागतो. प्रतीक गांधीची ही भूमिका पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच अभिनेता अनोखी भूमिका पहिल्यांदाच साकारणार आहे.
प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेता Song Young Kyu यांचे निधन, कारमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह
प्रतीक गांधी पाकिस्तानमध्ये संघर्ष करणार
प्रतिक गांधी पाकिस्तानमधील राजनैतिक बाबींशी जवळीक साधत असताना, तो एका पाकिस्तानी आयएसआय एजंटला भेटतो. ही भूमिका सनी हिंदुजा साकारत आहे. प्रतीक गांधी पाकिस्तानमध्ये काहीही करत असले तरी, त्याचे शत्रू त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. वेब सिरीजची ही कथा प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करणार आहे.
‘Coolie’ की ‘War 2’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण आहे पुढे? १४ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर होणार मोठी टक्कर
‘सारे जहाँ से अच्छा’ची स्टारकास्ट
प्रतीक गांधी आणि सनी हिंदुजा व्यतिरिक्त ट्रेलरमध्ये तिलोतमा शोम, कृतिका कामरा, रजत कपूर आणि अनुप सोनी यांसारखे कलाकार देखील दिसत आहेत. ‘सारे जहाँ से अच्छा’ ही मालिका गौरव शुक्लाने तयार केली आहे.
‘सारे जहाँ से अच्छा’ची रिलीज डेट जाहीर
ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की जर भारताच्या एजंटांनी थोडीशी चूक केली तर पाकिस्तान अणुयुद्ध सुरू करू शकतो. अशा परिस्थितीत भारतीय एजंटला पाकिस्तानी शत्रूंना अणुहस्त्रे बनवण्यापासून रोखावे लागते. ट्रेलरमधील एक संवाद प्रसिद्ध आहे. रजत कपूर प्रतीक गांधींना म्हणतो, ‘जर आपण अणुहल्ले थांबवू शकलो नाही तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का?’ यावर गांधी म्हणतात, ‘तिसरे महायुद्ध.’ यावर रजत कपूर म्हणतात, ‘नाही, शेवटचे महायुद्ध.’ मालिकेतील सर्व पात्रांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. ‘सारे जहाँ से अच्छा’ १३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.