(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या वर्षीचा स्वातंत्र्यदिन खूप खास ठरणार आहे. १४ ऑगस्ट रोजी दोन मोठे चित्रपट एकमेकांना चांगलीच टक्कर देणार आहे. एका बाजूला रजनीकांत यांचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘कुली’ प्रदर्शित होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा स्पाय युनिव्हर्स अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘वॉर २’ प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत आणि त्यांच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे.
अमेरिकेतील अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे काय ?
दोन्ही चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगमुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी प्रीमियर बुकिंग आधीच सुरू झाली होती. आता रिलीजपूर्व विक्रीचे आकडे समोर आले आहेत. वृत्तानुसार, रजनीकांतचा ‘कुली’ हा चित्रपट उत्तर अमेरिकेत अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत १ दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे आणि अमेरिकेत हा चित्रपट ११४७ शोसह ४३० ठिकाणी प्रदर्शित होणार आहे.
प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेता Song Young Kyu यांचे निधन, कारमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह
‘वॉर २’ ला ‘कुली’ने टाकले मागे?
‘वॉर २’ चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत फक्त १६८ हजार डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे आणि ५८२ ठिकाणी चित्रपटाचे १५८५ शो बुक झाले आहेत. या अहवालातून हे सिद्ध होते की प्री-बुकिंगच्या बाबतीत, ‘कुली’ सध्या ‘वॉर २’ पेक्षा खूप पुढे आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी हे आकडे आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. ‘कुली’ची क्रेझ केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात दिसून येत आहे. हा चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आधीपासूनच उत्सुक आहेत.
सोनाक्षी सिन्हानंतर सुधीर बाबूचा जबरदस्त लूक रिलीज, आता ‘Jatadhara’ च्या टीझरची चाहत्यांना उत्सुकता
दोन्ही चित्रपटांची स्टारकास्ट उत्कृष्ट
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा हा चित्रपट खूप खास असणार आहे. रजनीकांत व्यतिरिक्त नागार्जुन, आमिर खान, श्रुती हासन, सत्यराज आणि उपेंद्र राव सारखे प्रसिद्ध कलाकार ‘कुली’ मध्ये खास भूमिकेत दिसणार आहेत. दुसरीकडे, हृतिक रोशन, कियारा अडवाणी, ज्युनियर एनटीआर आणि आशुतोष राणा सारखे कलाकार यशराज स्पाय युनिव्हर्सच्या आगामी ‘वॉर २’ चित्रपटात दिसणार आहेत. आता कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणे बाकी आहे? प्रेक्षक कोणाला नंबर १ बनवेल आणि कोणता चित्रपट जास्त कमाई करेल हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.