Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saif Ali Khan: या चित्रपटांमधून अभिनेत्याने केले बॉलिवूडवर राज्य; आता आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरी एका अज्ञाताने चाकूने हल्ला केला आहे. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते चकित झाले आहेत. तसेच, सैफची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केली जाते.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 16, 2025 | 11:47 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न करताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि अनेक वेळा त्यावर वार करण्यात आला आहे. आता अभिनेता लीलावती रुग्णालयात दाखल आहे, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मुलांच्या खोलीत सैफ अली खानवर हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्याने हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी त्यांचा सामना केला. त्याच्यावर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले आणि त्याला दोन खोल जखमा झाल्या आहेत. एक मानेवर आणि दुसरी मणक्याजवळ. या बातमीमुळे अभिनेत्याचे चाहते चिंतेत आहेत. चला सैफ अली खानच्या चित्रपटांबद्दल आणि कारकिर्दीबद्दल जाणून घेऊयात.

इंडस्ट्रीचा छोटा नवाब
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सैफ अली खानला छोटे नवाब म्हणूनही ओळखले जाते. सैफ अली खान हा पतौडी कुटुंबाचा नेता आहे. सैफचा जन्म १६ ऑगस्ट १९७० रोजी झाला. सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत आणि आई शर्मिला टागोर ही एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांचे पूर्वज पतौडी राज्यातील नवाब होते. नवाब कुटुंबात जन्मलेल्या सैफने अभिनयाला आपले करिअर म्हणून निवडले. आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

चोरी की आणखी काही…सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं धक्कादायक कारण समोर, पोलिसांना मोलकरणीच्या भूमिकेवर संशय?

सैफची सुरुवातीची कारकीर्द
सैफने यश चोप्रा यांच्या बॅनरखाली बनवलेल्या ‘परंपरा’ चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु हा चित्रपट काही खास कामगिरी करू शकला नाही. यानंतर सैफला ‘ये दिल्लगी’ या रोमँटिक ड्रामा चित्रपट आणि ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या अ‍ॅक्शन चित्रपटातून ओळख मिळाली. जेव्हा या अभिनेत्याने यशाची शिडी चढायला सुरुवात केली तेव्हा त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि पुढे जात राहिला. आता अभिनेत्याचे नाव सावत्र गाजत आहे. त्याने चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

सैफचे कुटुंब
सैफ अली खानचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहे. सैफची आई शर्मिला टागोर ही एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. अभिनेत्याची पहिली पत्नी अमृता सिंग ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, तर त्यांची दुसरी पत्नी करीना कपूर खान देखील चित्रपट जगतातील एक स्टार आहे. अभिनेत्याची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याची बहीण सोहा अली खाननेही चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशाप्रकारे त्याचे संपूर्ण कुटुंब चित्रपट जगताचा एक भाग आहे. जे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.

सैफ अली खानला बनायचे होते वडिलांसारखे क्रिकेटर; अभिनेत्याने का निवडली बॉलिवूड इंडस्ट्री? वाचा सविस्तर!

सैफ अली खानची एकूण संपत्ती
सैफची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये होते. त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. चित्रपट जगतासोबतच, नवाब कुटुंबातील असल्यामुळे, लोक त्यांना ‘छोटे नवाब’ असेही म्हणतात. सैफला गाड्यांचा खूप शौक आहे. त्याच्या करोडो रुपयांच्या कार कलेक्शनला पाहून अगदी जवळचे लोकही थक्क होतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफची एकूण संपत्ती सुमारे १५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १२०० कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५००० कोटी रुपये आहे.

सैफचे हिट चित्रपट
सैफ अली खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले आहे. आपल्या ३० वर्षांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत सैफने ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘आरजू’, ‘कच्चे धागे’, ‘सलाम नमस्ते’, ‘हम तुम’, ‘लव्ह आज कल’, ‘ओमकारा’ असे अनेक चित्रपट दिले आहेत. ‘, ‘गो गोवा गॉन’ त्यांनी ‘कल हो ना हो’, ‘परिणीता’, ‘रेस’, ‘टशन’ आणि ‘तान्हाजी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

सैफ अली खानचा आगामी चित्रपट
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सैफ अली खानही सध्या सिनेमात वेळ घालवत आहे. हा अभिनेता शेवटचा ‘देवरा भाग १’ मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला होता. तर सैफ जयदीप अहलावतसोबत ज्वेल थीफमध्ये दिसणार आहे. आधी जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन आणि आता सैफ अली खान जखमी झाल्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

Web Title: Saif ali khan attacked know about career struggles net worth hit films car collection love story with kareena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • entertainment
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे
1

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित
2

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!
3

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत
4

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.