Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लॅमरच्या झगमगाटात नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस; ‘मोहिनी’ मालिकेत पाहायला मिळणार प्रेमाचा नवा संग्राम

कलर्स मराठीवर नवी प्रेमकहाणी लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मोहिनी' या आगामी मालिकेचे नाव असून, या मालिकेत नवी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 01, 2026 | 11:49 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्लॅमरच्या झगमगाटात नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस
  • ‘मोहिनी’ मालिकेत पाहायला मिळणार नवी प्रेमकथा
  • ‘मोहिनी’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित
 

मनोरंजन सृष्टीचा झगमगाट, चाहत्यांची वेडी गर्दी आणि स्टारडमचा जल्लोष… या सगळ्या चकाकीमागची खरी कहाणी उलगडणारी नवी मालिका मोहिनी लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही केवळ प्रेमकहाणी नाही, तर स्वाभिमान, संघर्ष, अहंकार आणि नियती यांच्या संघर्षातून जन्मलेली एक धगधगती भावकथा आहे. या मालिकेत नवी प्रेम कथा पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

फिल्मी दुनियेच्या सेटवर वाढलेली एक सामान्य मुलगी मोहिनी… आणि त्याच सेटवर राज्य करणारा सुपरस्टार RK. बॉलीवूडच्या झगमगाटामागे दडलेले त्याग, कष्ट आणि भावनिक घालमेल यांची वास्तवदर्शी बाजू ही मालिका प्रभावीपणे मांडणार आहे. नशिबाने लिहिलेला मोहिनीचा साधा पण जिद्दी प्रवास आणि अहंकाराने उभं केलेलं RK चं दिमाखदार विश्व जेव्हा समोरासमोर येते, तेव्हा एका अनपेक्षित नात्याची सुरुवात होते. दोन पूर्णपणे भिन्न स्वभावाचे हे दोन व्यक्तिमत्त्वे समोरासमोर आल्यावर नेमकं काय घडणार, हे सगळं मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

Sonal Chauhan: दुबई विमानतळावर अडकली बॉलीवूड अभिनेत्री; थेट पंतप्रधान मोदींकडे केले मदतीचे आवाहन

या मालिकेत ‘मोहिनी’ची भूमिका अनघा ठाकूर साकारत असून, समीर परांजपे ‘RK’च्या भूमिकेत झळकणार आहेत. पहिल्याच प्रोमोमध्ये सेटवरील एक वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. शूटिंग थांबलेलं व्हिडीओमध्ये दिसत असून, कुणी लाईटला टेकून बसलेलं, कुणी गप्पांमध्ये रमलेलं, तर दिग्दर्शक खुर्चीत शांत बसलेले दिसत आहे. इतक्यात स्टुडिओचा दरवाजा उघडतो आणि RK ची एन्ट्री होते. क्षणार्धात वातावरण बदलतं. “Let’s Roll!” असा आवाज घुमतो, लाईट्स लागतात आणि हातात कॉफी मग घेत RK चा रुबाबदार अंदाज समोर येतो.

“मेकअप!” अशी हाक दिल्यानंतर मेकअप बॅग घेऊन धावत येणारी मोहिनी आणि पुढे चालत येणाऱ्या RK ची धडक होते. मेकअपचं सामान खाली सांडतं. त्यावर पाय ठेवत RK म्हणतो, “मेकअपचं तर सामान आहे फक्त…” त्यावर मोहिनी ठामपणे उत्तर देते, “सामान मेकअपचंच आहे… पण ‘फक्त’ नाही. हेच सामान माणसाला कलाकार, कलाकाराला स्टार आणि स्टारला सुपरस्टार बनवतं. अहंकार असणाऱ्याला याचं भान नसतं; पण जाणते कलाकार याला मान देतात.” क्षणात सेटवर शांतता पसरते. संतापलेल्या RK कडून “हे तू RK ला सांगणार?… PACKUP!” अशी घोषणा होते आणि तो निघून जातो.

BO Collection : पहिल्या दिवशी 75 लाख तर, दुसऱ्या दिवशी कोटींची कमाई; The Kerala Story 2 चा सिनेमागृहात कल्ला

सेटवर सुरू झालेली ही टक्कर जेव्हा खऱ्या आयुष्याच्या पडद्यावर येईल, तेव्हा काय होईल? सुपरस्टारचा अहंकार जिंकेल की मेकअप आर्टिस्ट मोहिनीचा स्वाभिमान? प्रकाशझोतात नसूनही स्वतःच्या कष्टाने प्रकाश निर्माण करणारी मोहिनी आणि स्वतःच्या स्टारडमच्या कवचात वावरणारा RK – हे दोन विरुद्ध ध्रुव जेव्हा एकत्र येतील, तेव्हा निर्माण होणारी ठिणगी प्रेमात बदलेल की संघर्षात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘मोहिनी’ मालिका प्रेक्षकांना पाहावी लागणार आहे.

Web Title: Mohini new serial colors marathi anagha thakur sameer paranjape promo update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Colours Marathi
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sonal Chauhan: दुबई विमानतळावर अडकली बॉलीवूड अभिनेत्री; थेट पंतप्रधान मोदींकडे केले मदतीचे आवाहन
1

Sonal Chauhan: दुबई विमानतळावर अडकली बॉलीवूड अभिनेत्री; थेट पंतप्रधान मोदींकडे केले मदतीचे आवाहन

BO Collection : पहिल्या दिवशी 75 लाख तर, दुसऱ्या दिवशी कोटींची कमाई; The Kerala Story 2 चा सिनेमागृहात कल्ला
2

BO Collection : पहिल्या दिवशी 75 लाख तर, दुसऱ्या दिवशी कोटींची कमाई; The Kerala Story 2 चा सिनेमागृहात कल्ला

Ramayana ला मिळालं जागतिक व्यासपीठ; रणबीर कपूरच्या चित्रपटाचा ट्रेलर San Diego Comic-Con मध्ये होणार लाँच
3

Ramayana ला मिळालं जागतिक व्यासपीठ; रणबीर कपूरच्या चित्रपटाचा ट्रेलर San Diego Comic-Con मध्ये होणार लाँच

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल
4

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.